सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये कामगार दिन मोठ्या उत्साहात.


यावल दि. २ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दि.१ मे २०२५ म्हणजे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिन यावल येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सरदार इंग्लिश मीडियम स्कूलचे परिवहन समितीचे अध्यक्ष जनार्दन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रगीत म्हणण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र महाजन सर,दीपक महाजन शशीकांत फेगडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

