वरणगावमध्ये कराटे व लाठी काठी प्रशिक्षणाचे जल्लोषात उद्घाटन

-मुलींच्या चित्तथरारक प्रात्याशिकाला उपस्थितांनी दिली दाद
वरणगाव खानश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव – १ मे कामगार व महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शहरातील महात्मा फुले नगरातील हॉलमध्ये मुलींसाठी कराटे व लाठीकाठी प्रशिक्षणाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कराटेचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींनी अंगावर काटा उभा राहील अशा विविध प्रकारच्या चित्तथरारक व रोमहर्षक प्रात्यक्षिके करून उपस्थित मान्यवरांसह पालक व नागरिकांचेही मन जिंकले.
शिवसेना, शिवबा मित्र मंडळ आणि आपला माणूस मित्रपरिवार यांच्या वतीने वरणगाव शहरातील मुलींसाठी कराटे व लाठीकाठी तीन महिन्याचे मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून १ मे रोजी सायंकाळी महात्मा फुले नगरातील हॉलमध्ये वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय जनार्दन खंडेराव, सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे, शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, दूध फेडरेशनच्या संचालिका शामल झांबरे, हनुमान व्यायाम शाळेचे वस्ताद नामदेव मोरे, सुपडू सोनवणे, पत्रकार बाळासाहेब चव्हाण, संजय बावस्कर निवृत्ती माळी, कृष्णा माळी, राजेश इंगळे, हिप्पा मिर्झा, सुरेश चौधरी, राम शेटे या मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली.

प्रास्ताविक कराटे व लाठीकाठी प्रशिक्षणाचे आयोजक भुसावळ शिवसेना विधानसभा प्रमुख तथा शिवबा मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष माळी यांनी सांगितले की, या कराटे प्रशिक्षणाला ६० मुलींनी सहभाग घेतला असल्याचे सांगितले. प्रसंगी एपीआय जनार्दन खंडेराव यांनी सांगितले की, मुलींना कराटेचे प्रशिक्षण मिळणे हे काळाची गरज आहे. मुली बाहेर पडल्यानंतर मुलींच्या आत्म स्वरक्षणासाठी त्यांना कराटे येत असल्यास ते स्वतः ला वाचवू शकतील असे त्यांनी सांगितले. मोफत कराटे प्रशिक्षणाचे कौतुकही खंडेराव यांनी केले. शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, चंद्रकांत हरी बढे, शामल झांबरे यांनीही आपल्या मनोगतात मुलींना कराटे येणे आजची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले. व्यासपीठावर हनुमान
-चित्तथरारक प्रात्यक्षिकाने मन जिंकली
ब्लॅक बेल्ट असलेले प्रशिक्षक विनोद सुरवाडे यांनी तीन महिन्यांपूर्वी कराटेचे प्रशिक्षण दिलेल्या मुलींनी अंगावर कौल फोडणे, जडते कौल ऐका पंच मध्ये फोडणे, अंगावरून दू चाकी मोटरसायकल चालविणे, फाईट करणे अशा विविध प्रकारचे चित्त थरारक प्रात्यक्षिके विनस विनोद सुरवाडे यांनी मुलींकडून करून घेतले. यावेळी लाठीकाठी दानपट्टा, जळत्या काड्या फिरवणे असे साहसी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके केदार माळी व त्यांच्या टीमने करून दाखविले.
यशस्वीतेसाठी शिवबा मंडळाचे ज्येष्ठ बापू माळी, भूषण माळी, किरण माळी, विशाल माळी, तेजस माळी, निखिल माळी, मयुर माळी, पप्पू माळी, ओम माळी, रितेश माळी, संकेत माळी, प्रशांत निंबाळकर, उमेश माळी यांनी परिश्रम घेतले.

