Friday, June 6, 2025
Homeजळगावउबाठाला यावल शहरात पावसाळ्यापूर्वीच गळती.युवा सेना तालुकाप्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदे गटात दाखल.

उबाठाला यावल शहरात पावसाळ्यापूर्वीच गळती.युवा सेना तालुकाप्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदे गटात दाखल.

उबाठाला यावल शहरात पावसाळ्यापूर्वीच गळती.युवा सेना तालुकाप्रमुख कार्यकर्त्यांसह शिंदे गटात दाखल.

पंकज बारी यांच्या प्रयत्नांना यश.

यावल दि.१९  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
दि.१७ रोजी यावल येथे ऊबाठा गटातील युवा सेना तालुकाप्रमुख डॉ.विवेक अडकमोल यांनी त्यांच्या संपूर्ण उभाठा युवा सेना कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन सर व यावल तालुकाप्रमुख राजू काठोके,यावल शहर प्रमुख पंकजभाऊ बारी,उपशहर प्रमुख राजू सपकाळे,उपशहर प्रमुख चेतन सपकाळे,युवा सेना तालुकाप्रमुख अजय तायडे,तालुका संघटक गोलू पाटील यांच्या उपस्थितीत केला यामुळे पावसाळ्यापूर्वीच ऊबाठा शिवसेनेला गळती लागल्याचे आणि
यावल शहर प्रमुख पंकज बारी यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे राजकारणात बोलली जात आहे.

राज्यातील राजकारणाच्या सक्रिय, सकारात्मक,जनहिताच्या हालचाली लक्षात घेता तसेच जिल्हाध्यक्ष समाधान महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल शहराध्यक्ष पंकज बारी यांची कार्यकर्त्यांची भक्कम फळी व त्यांचे कार्य लक्षात घेता शिवसेना ऊबाठा पक्षातील तालुका युवा सेना प्रमुख डॉ.विवेक अडकमोल हे आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदे शिवसेना गटात दाखल झाले. यांचे सर्वांचे स्वागत जिल्हाध्यक्ष समाधान महाजन सर्व तालुका पदाधिकारी यांनी केले. शिंदे गटाचे सभासद नोंदणीला सुद्धा यावल शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाध्यक्ष समाधान महाजन सर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या