Wednesday, May 28, 2025
Homeजळगावसर्व सजीवांना प्रसादरूपी वृक्ष संगोपना सहीत दान करा पर्यावरण तज्ञ सुरेंद्र सिंग...

सर्व सजीवांना प्रसादरूपी वृक्ष संगोपना सहीत दान करा पर्यावरण तज्ञ सुरेंद्र सिंग पाटील यांचे आवाहन

सर्व सजीवांना प्रसादरूपी वृक्ष संगोपना सहीत दान करा
पर्यावरण तज्ञ सुरेंद्र सिंग पाटील यांचे आवाहन

भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी              आपण आपल्या देवतास, धरतीमातेस साक्षीदार करून धरतीवर डोके अथवा हात टेकून सुख समृद्धी मागतात . साक्षीदार धरतीमातेला मानवासहित सर्व सजीवांना आवश्यक प्रसादरुपी वृक्ष संगोपनासहित दान करावे . असे आवाहन डॉ. सुरेंद्रसिंग पाटील. यांनी केले आहे .

आपण विविध जाती, धर्म पंथ आपण मानत असलेले देवता वेगवेगळ्या रूपाने असतील परंतु सर्वांचा साक्षीदार एकच आहे धरतीमाता कुठलाही जातीभेद धर्मभेद न करता आपण सर्व धरती मातेचे लेकर आहात ज्याप्रमाणे आपण कुठल्याही ऑफिसमध्ये जातो तेव्हा दारावर आपणास सुरक्षारक्षकास नमस्कार करावा लागतो तसाच आपण मानत असलेल्या विविध देवी-देवतांना नमस्कार करताना येताना जाताना मंदिराच्या बाहेर असलेल्या देवाचे वाहन असलेल्या उदाहरणार्थ नंदीबैल, कासव तसेच धरतीला नमस्कार करावाच लागतो

सद्यस्थितीत काही कारणास्तव पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने धरतीमाता आपल्या सर्वांवर नाराज असल्याने आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे उदाहरणार्थ ग्लोबल वार्मिंग मुळे गेल्या तीन वर्षात आपण म्हणत होतो . आपले ऋतू एक महिन्याने पुढे सरकलेले आहेत त्यामुळे मान्सूनचे आगमन एक महिना पुढे होत आहे .
परंतु आज रोजी आपण मान्सूनच्या आगमन पंधरा दिवस आधी होत आहे असे म्हणत आहोत पावसाळा सुरू होण्याच्या वेळेस कधीही इतके दमट वातावरण आपण बघितलेले नाही .
हे सर्व सजीवांना आवश्यक असलेले वृक्षांची संख्या काही कारणास्तव भरपूर प्रमाणात कमी झालेले आहेत साक्षीदार जर नाराज असेल तर भगवंतही आपण कितीही दानरूपी रक्कम कितीही ठेवले कितीही अन्नदान केले तरी आपली इच्छा पूर्ण होत नाही .
आपण सर्व धरतीचे लेकरं आहोत सर्व सजीवांचा समतोल राखणारी धरतीमाता अतृप्त असून तर ती तृप्त होण्यासाठी मानवासहित सर्व सजीवांना आवश्यक असलेले विविध प्रकारच्या प्रसाद रुपी वृक्षांची संगोपनासहित दान करावे पर्यावरण तज्ञ डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान कुठल्याही धार्मिक स्थळी प्रत्येक जण धरतीवर आपले डोकं ठेवून साष्टांग नमस्कार करणारे तसेच त्यांच्याकडून नमस्कार होत नाही ते धरती मातेला हात लावून आपण विविध धर्मानुसार जातीनुसार वेगवेगळ्या देवतांना धर्मगुरूंना नमस्कार करत असतो आपली मागणी देवाजवळ पूर्ण होण्यासाठी साक्षीदार धरतीमाता प्रसन्न होण्यासाठी सर्व सजीवांना आवश्यक असलेली विविध प्रकारचे वृक्ष संगोपनासहित लावावे कुठलाही जातीभेद धर्मभेद न मानता सर्वांना एकसारखी न्याय देणारी सर्वांना आपली लेकरं मानणारी धरतीमाता आनंदी असेल तर सर्व मानवासहित सर्व सजीव आनंदी राहतील असेही पर्यावरण तज्ञ सुरेंद्र सिंग पाटील यांनी सांगितले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या