यावल न.प.पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३ महिन्यापासून पगार नसल्याने काम बंद आंदोलन सुरू.
यावल शहराचा पाणीपुरवठा ठप्प.
यावल दि.२९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा व अग्निशमन विभाग कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३ महिन्यापासून पगार न मिळाल्याने त्यांनी आज दि. २९ पासून आपले काम बंद आंदोलन सुरू केल्याने संपूर्ण यावल शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
यावल नगरपरिषद पाणीपुरवठा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दि.
२८ दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की आम्ही सर्व पाणीपुरवठा व अग्निशामक विभाग कंत्राटी कर्मचारी विनंतीपूर्वक कळवितो की नगरपालिकेत आम्ही काही वर्षापासून कार्यरत आहोत तरी सध्याचे ठेकेदार यांनी आमचे ३ महिन्याचे पगार दिले नाही सदर ठेकेदारास आम्ही विचारणा केली असता त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे की माझे बिल तीन ते चार महिन्यापासून नगरपालिकेने अदा केले नाही त्यामुळे मी तुमचे पगार करू शकत नाही.
कंत्राटी कर्मचारी हे सामान्य गरीब कुटुंबातील आहेत त्यांचा उदरनिर्वाह त्यांच्या पगारावरच आहे तरी सध्या तीन महिन्याचा पगार झाला नसल्याने त्यांच्या कुटुंबियांचे उपासमार होत आहे त्यामुळे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे अन्यथा आम्ही दि.२८ जे मध्यरात्रीपासून काम बंद आंदोलन करीत आहे अशी सूचना दिल्यावर सुद्धा यावल नगर परिषदेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणे बाबतची व्यवस्था न केल्याने कंत्राटी कामगारांचे आजपासून काम बंद आंदोलन सुरू झाले आहे.
यावल शहराचा गेल्या आठ-दहा दिवसापासून पाणीपुरवठा विविध कारणांनी अनियमित व ठप्प झालेला असल्याने यावलकर पाण्यासाठी भटकंती करीत आहेत त्यामुळे यावल नगरपालिकेने तसेच लोकप्रतिनिधींनी, समाजसेवकांनी तात्काळ लक्षात केंद्रित करून यावल शहराचा पाणीपुरवठा तात्काळ पूर्ववत मुबलक कसा होईल याबाबत कार्यवाही करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.