यावल शहरात अहिल्यादेवींना अभिवादन : अहिल्यादेवींचे विचार समाजाला दिशा देणारे : आमदार अमोल जावळे
यावल दि.३१ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी समाजाला दिशा
देण्याचे काम केले असून त्यांचे विचार प्रत्येक घटकापर्यंत
रुजवण्याची गरज आहे असे मत आमदार अमोल जावळे यांनी व्यक्त
केले.यावल येथे म्हसोबा देवस्थाना जवळील धनगर वाड्यात धनगर समाजातर्फे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती आमदार अमोलदादा जावळे यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्यावेळी कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त समाजातर्फे यावल शहरातून मेनरोडने भव्य मिरवणूक काढण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात म्हसोबा देवस्थान जवळ धनगरवाड्यात अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेची पूजा दीप प्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी आमदार अमोलदादा जावळे,तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,उपाध्यक्ष मुकेश कोळी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांसह विशाल शिर्के,सागर धनगर,भरत धनगर,रवी धनगर, राजू धनगर,नितीन महाजन.धनगर समाज सर्व स्तरातील स्त्री पुरुष नागरिक तरुण पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.