गणेशनगर पूर्णवादनगर मध्ये घरफोडी, रस्ता लूट, दरोडा पडण्याची दाट शक्यता…

यावल दि.३० खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल नगरपालिकेच्या टक्केवारी व हेकेखोरपणामुळे यावल शहरातील
फैजपुर रोडला लागून असलेल्या गणेशनगर पूर्णवादनगर मध्ये गेल्या तीन चार दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद असल्याने या भागात रात्रीच्या वेळेस अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्यामुळे घरफोडी,रस्ता लूट,आणि एखाद्या वेळेस मोठा दरोडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून गणेशनगर पूर्णवादनगर मधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढणार असल्याने पोलिसांनी नगरपालिकेला जाब विचारून सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

