Monday, June 2, 2025
Homeजळगावयावल एसटी बस स्टॅन्ड आगाराचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

यावल एसटी बस स्टॅन्ड आगाराचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

यावल एसटी बस स्टॅन्ड आगाराचा ७७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

यावल दि.१   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज रविवार दि. १ जून २०२५ रोजी रा.प.यावल आगारात एस.टी.महामंडळाचा एस.टी चा ७७ वा वर्धापन दिवस यावल येथील नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाप्रसंगी यावल तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार गांगुर्डे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व प्रवाशी यांचे हस्ते बसचे पूजन करण्यात आले .कठोरा येथील दत्तात्रय महाराज यांनी विधी वत पूजा केली.सदर कार्यक्रमाप्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप भास्कर महाजन,तेजस शुक्ल (सका अ )वाहतूक निरीक्षक एस. एम.सोनवणे,बारसे (आगार लेखाकार ),दिपक चौधरी,तसेच आगारातील लिपीक भावसार मॅडम,संदिप पाटील,अतुल चौधरी, अतुल यादव,रज्जाकतडवी (वाहतूक नियंत्रक )बी.के.तडवी,डी. एन.ठाकरे,सुकलाल सूर्यवंशी,
अनिल बागुल,डी.बी.धनगर व इतर कर्मचारी व प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आगार व्यवस्थापक यांनी प्रवाशांचे स्वागत केले सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला कार्यक्रमा प्रसंगी प्रवाशांना गुलाब पुष्प व साखर पेढा देऊन स्वागत करण्यात आले.दिपक गुरव ( शिपाई ) व इतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या