सन २०१७ मध्ये बांधकाम झालेली व्यायाम शाळा आजही बंदच.
मनसेने केले अनेक प्रश्न उपस्थित.
यावल दि.२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल तालुक्यातील नायगाव येथे सन २०१७ मध्ये व्यायाम शाळेचे बांधकाम झाले आहे परंतु गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत व्यायाम शाळेत व्यायाम करण्यासाठी साहित्य उपलब्ध न झाल्याने आजही व्यायाम शाळा बंद असल्याने तसेच व्यायाम शाळा सुरू न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदन देऊन ग्रामपंचायतचे लक्ष वेधले आहे.
व्यायामशाळा सुरु न झाल्याबाबत ग्रामपंचायतीला मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी लेखी निवेदन देऊन व्यायाम शाळा तात्काळ सुरू करण्याची मागणी केली.
नायगाव येथील सरपंच नूरजान सर्फराज तडवी यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की
नायगाव येथे सन २०१७ -१८ मध्ये व्यायामशाळेचे बांधकाम करण्यात आले आहे.मात्र आज सात ते आठ वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही सदर व्यायामशाळा सुरु करण्यात आलेली नाही. व्यायामासाठी लागणारे साहित्य अद्याप उपलब्ध नाही,आणि व्यायामशाळा गावकऱ्यांच्या उपयोगासाठी खुली करण्यात आलेली नाही.निवेदन देताना जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार,निलेश पाटील,योगेश कोळी व हितेश कुंभार उपस्थित होते. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की
व्यायामशाळेसाठी लागणारे साहित्य अद्याप का उपलब्ध झालेले नाही याबाबत खुलासा करण्यात यावा.ग्रामपंचायतीने साहित्याची मागणी केली असल्यास संबंधित एन.ओ.सी. (NOC) ची झेरॉक्स प्रत देण्यात यावी.व्यायामशाळा बंद असल्यामुळे युवक, विद्यार्थी व आरोग्यप्रेमी नागरिकांचे होणारे नुकसान कोणी भरून काढावे कामात झालेल्या दिरंगाईस जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी.व्यायामशाळा तातडीने सुरु करून ग्रामस्थांच्या वापरासाठी खुली करावी.
ग्रामस्थांच्या आरोग्याशी व युवकांच्या भविष्यासोबत संबंधित असलेली ही सुविधा इतक्या वर्षांपासून प्रलंबित ठेवणे हे अत्यंत दुर्दैवी आहे.त्यामुळे तातडीने कार्यवाही करण्यात यावी,अन्यथा ग्रामस्थां सोबत आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशाराही मनसेतर्फे देण्यात आला असला तरी ग्रामपंचायत काय कारवाई करणार याकडे आता ग्रामस्थांसह मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या लक्ष लागून आहे.