राष्ट्रीय महामार्ग बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात फैजपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न

यावल दि.३ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण संदर्भात प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे आमदार अमोलदादा जावळे यांच्या व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यावल तालुक्यातील फैजपूर येथे महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बुऱ्हानपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा तळोदा – शिरपूर – चोपडा – यावल – फैजपूर – सावदा – रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाच्या चौपदरीकरण मंजूर झालेले असून याबाबत जमीन संपादन व इतर प्रक्रिया प्रगतीपथावर असून, सदर महामार्गाच्या चौपदरीकरण बाबतीत भूसंपादन होत असलेले शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या अनेक समस्या येत असल्याने आज फैजपूर येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार श्री. अमोल हरिभाऊ जावळे व भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संबंधितांच्या सर्व समस्या व मागण्या जाणून घेतल्या व याबाबत लवकरच योग्यती कार्यवाही करून पाठपुरावा करणे बाबत आश्वासन दिले.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आमदार अमोलदादा हरिभाऊ जावळे,भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसिलदार व स्थानिक सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते आणि चोपडा,यावल व रावेर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

