पटेल कुटुंबीयांनी साखरपुड्याचे आमंत्रण दिले नाही म्हणून लाठ्या काठ्यानी मारहाण. गुन्हा दाखल.

६ जण जखमी, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.
यावल दि.४. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी साखरपुड्याचे आमंत्रण दिले नाही म्हणून ७ जणांनी ६ जणांना लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दि.२ रोजी घडल्याने यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे आरोपींना अटक केली जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी पीएसआय वाघमोडे यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की कोरपावली येथील मुबारक सलीम पटेल वय ४० यांनी यावल पोस्टेला फिरत दिली की सोमवार दि. २ दोन रोजी रात्री १:२० वाजेच्या सुमारास यावल शहरातील बोरावल गेट परिसरातील पटेल कुटुंबीयातील ७ जणांना साखरपुड्याचे आमंत्रण दिले नाही म्हणून या सात जणांनी शब्बीर नजीर पटेल, आस्मा शब्बीर पटेल, रेश्मा शब्बीर पटेल, नशीम शब्बीर पटेल, समीर शब्बीर पटेल यांना लाठ्या काट्यांनी जबर मारहाण केल्याच्या कारणावरून यावल येथील बोरावल गेट जवळ राहणारे मुसा मजीद पटेल,पप्पू मुसा पटेल, हुसेन मुसा पटेल, मीना मुसा पटेल जावेद मुनाफ पटेल आणि या जावेद मुनाफ पटेल, यासीन जावेद पटेल या ७ जणांविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय वाघमोडे करीत असून आरोपींना अटक केली जाईल असे त्यांनी सांगितले.

