Saturday, March 14, 2026
Homeजळगावकाँग्रेस कमिटी यावल ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी शेखर पाटील.

काँग्रेस कमिटी यावल ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी शेखर पाटील.

काँग्रेस कमिटी यावल ग्रामीण ब्लॉक अध्यक्षपदी शेखर पाटील.

यावल दि.७    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव ग्रामीण जिल्ह्यातील यावल ग्रामीण ब्लॉकच्या अध्यक्षपदी यावल तालुक्यातील सौखेडा येथील शेखर सोपान पाटील यांची नियुक्ती.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांनी केली.
महाराष्ट्रात प्रदेश काँग्रेस कमिटी प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार उपाध्यक्ष ॲड.गणेश पाटील यांनी जळगाव ग्रामीण जिल्ह्यातील यावल ग्रामीण ब्लॉकच्या अध्यक्षपदी यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील यांची नियुक्ती केली.तसेच पंधरा दिवसाचे आत ब्लॉक कार्यकारणी तयार करून जिल्हाध्यक्ष यांच्याकडे देण्याची सूचना करण्यात आली असून ब्लॉक मध्ये काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावे असे सुद्धा दिलेल्या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या