Thursday, June 12, 2025
Homeजळगावराष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का: जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ शिवसेनेत...

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का: जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ शिवसेनेत प्रवेश ? नाथाभाऊंचा आणखी एक नेता शिवसेनेच्या गोठात

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का: जिल्हा उपाध्यक्ष विनोद तराळ शिवसेनेत प्रवेश ? नाथाभाऊंचा आणखी एक नेता शिवसेनेच्या गोठात

मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर) – जिल्हा परिषदेचे माजी गटनेते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे जिल्हा उपाध्यक्ष आणि सहकार क्षेत्रात आपली भक्कम छाप निर्माण करणारे विनोद तराळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

या कारणाने आमदार खडसे यांचा आणखी एक नेता शिवसेनेत गेल्याने राष्ट्रवादी पक्षाची मोठी हानी झाली आहे .
दिनांक 11 रोजी मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्यनेते यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

विनोद तराळ हे पिढ्यानपिढ्या शरद पवार कुटुंबीयांशी जवळचा संबंध असलेले व्यक्तिमत्व मानले जाते. त्यांच्या वडिलांपासूनच पवार कुटुंबाशी असलेली घनिष्ठ नाळ राजकीय व सामाजिक कार्यात दिसून आली आहे.
परंतु सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे आणि मतदारसंघातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा धाडसी निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.

विनोद तराळ यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच विविध ग्रामपंचायतीचे सरपंच आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा प्रवेश सोहळा केवळ एक राजकीय बदल न ठरता, मुक्ताईनगर तालुक्याच्या राजकारणातील एक मोठी हालचाल मानली जात आहे.

या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीवर थेट परिणाम होणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संघटनात्मक शक्तीला मोठे खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तर दुसरीकडे, शिवसेनेला या भागात नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे.

शिवसेना अधिक बळकट – तराळ यांचे प्रवेशाने पक्षात उत्साह

विनोद तराळ यांचा शिवसेनेत प्रवेश हा पक्षासाठी रणनीतीच्या दृष्टीने मोठा टप्पा मानला जात आहे. त्यांच्या अनुभवसंपन्न नेतृत्वामुळे आणि स्थानिक पातळीवरील प्रभावामुळे पक्षाला ग्रामीण भागात अधिक बळकटी प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर सहकार क्षेत्रातील त्यांचे अनुभव शिवसेनेला व आमदार चंद्रकांत पाटील यांना नवे दिशा देणारे ठरणार आहेत, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या