बच्चुभाऊ कडू यांच्या अन्न त्याग आंदोलनाला यावल तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचा पाठिंबा.
यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी बच्चुभाऊ कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी यावल तालुका अध्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे शनिवार दि.१४ जून २०२५ रोजी यावल येथे आंदोलन करणार असल्याचे निवेदन यावल तहसीलदार आणि यावल पोलीस यांना देण्यात आले.
यावल तहसीलदार,यावल पोलीस यांना आज दि.१२ जून २०२५ दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,हक्कासाठी बच्चू भाऊ कडु यांच्या नेतृत्वाखाली श्री क्षेत्र गुरुकुंज मोझरी येथे दि. ८ जून पासुन बेमुदत
सविनय निवेदन आहे की, शेतकरी कष्टकरी कामगार दिव्या महिला व अन्य वंचित घटकांच्या न्याय
अन्नत्याग आंदोलन सुरु आहे परंतु शासनाने रास्त मागण्याबाबत अद्यापर्यंत कुठलीही दखल न घेतल्याने प्रहार दिव्यांग क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांचा पुर्ण पाठिंबा आहे.या आंदोलनाला बळ देण्यासाठी व शासनाने लक्ष वेधण्यासाठी शनिवार दि.१४ जुन २०२५ रोजी संपुर्ण राज्यभरात प्रहार क्रांती संघटनेतर्फे लोकशाही शांततेत् प्रभावी आंदोलन करण्यात येणार आहे.सदर आंदोलन पुर्णपणे लोकशाही मार्गाने शांततेत व नियमानुसार पार पडेल यांची ग्वाही देतो तरी प्रशासनाने यांची नोंद घ्यावी व आवश्यक त्या सुविधी व सहकार्य करावे ही विनंती
टिप शासनाने आंदोलनाची ताक्ताळ दखल घ्यावी नाहीतर आंदोलन या पेक्षा तीव्र होईल आणि झालेल्या परिणामास शासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात यावल तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटना अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील जिल्हा सल्लागार शरद बारजिभे यांची स्वाक्षरी असून यांच्यासह निवेदन देताना सुरेश मांगो पाटील,
लश्मण किसन पाटील,किरण
पांडुरंग महाजन, प्रतिक वासुदेव पाटील,गौरव महाजन,सजय नथ्थू
पाटील उन्मेष विक्रम अडकमोल उपस्थित होते.