Saturday, May 2, 2026
Homeजळगावफैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबीर अभियानात ६८१ समास्यांचे निराकरण

फैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबीर अभियानात ६८१ समास्यांचे निराकरण

फैजपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज
महाराज समाधान शिबीर अभियानात ६८१ समास्यांचे निराकरण

फैजपूर खान्देश लाईव्ह प्रतिनिधी – दिनांक १६ / ०६ / २०२५ रोजी ऐतिहासिक फैजपूर शहरातील खंडोबा वाडी देवस्थानचे सभागृहात महाराष्ट्र शासनाव्दारे आयोजित पिंटू तेली इत्यादी मान्यवरासोबत श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज शिबिराचे आयोजन मा. आमदार अमोलदादा जावळे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक भाषणात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी शिबिराचे महत्व पटवून देताना सांगितले की, सध्या शासनाचे सर्व विभागाच्या योजना या संगणीकृत प्रणाली व्दारे राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकाना सदर योजने बाबत एकाच छता खाली माहीती मिळाल्यास सदर शिबिराचे उद्दिष्ट सफल होईल. या करीताच या शिबिराचे नाव समाधान शिबीर ठेवण्यात आलेले आहे.
फैजपूर विभागाचे उप विभागीय अधिकारी श्री बबनराव काकडे यांनी आपल्या देखरेखीखाली परिसरातील सर्व विभाग प्रमुखांचे उपस्थितीत शिबिराबाबत व नागरिकांचे उपस्थिती बाबत समाधान व्यक्त करून शालेय विदयार्थी याना शालेय साहित्या सह दाखले वितरीत केले. आमदार अमोल जावळे यांनी कार्यक्रमास हजेरी लावून नागरिकांमध्येच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यांनी अध्यक्षीय भाषणात शासनाच्या
विविध योजनांची माहीती दिली. व त्याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा असे आवाहन केले.
मा. आमदार अमोलदादा जावळे व्यस्त असतानाही या कार्यक्रमामध्ये त्यांनी सर्वांशी वार्तालाप केला. एकाच छत्राखाली सर्व विभागाचे कामकाज होणेबाबत व शासकीय योजनांची माहीती नागरिकाना होणे कामी या पुढेही मंडळ स्तरावर अशा प्रकारचे समाधान शिबीर नियमित आयोजित करण्यात येणार असून प्रत्येक नागरिक समाधानी झाल्यावरच सदर शिबीर नावाप्रमाणे सफल होईल असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महामंडलेश्वर पवनदासजी महाराज, बी. के. चौधरी, नितीन राणे, माजी जि प सदस्य भरतभाऊ महाजन, शरदभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष पिंटूभाऊ राणे, पांडुरंग

 


सराफ, पप्पू चौधरी, राजेश महाजन, रामा होले, नरेंद्र चौधरी, जयश्री चौधरी, शे. कुर्बान, गोटू भारंबे, नितीन चौधरी न्हावी, नितीन नेमाडे, दिव्यांग बांधव राहुल चौधरी, नितीन महाजन, नानाभाऊ मोची इत्यादी मान्यवरासह तलाठी फैजपूर, न्हावी, मारूळ, पिंपरूड तसेच मंडळ अधिकारी गजेंद्र शेलकर, नायब तहसीलदार संतोष विनंते, गांगुर्डे, मनोज खारे, शैलेश तरसोदे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार श्री गणेश गुरव यांनी मानले.

असे झाले कामकाज व दाखल्यांचे वाटप —
महसूल विभाग–
जिवंत 7/12 – 72, ई हक्क नोंदणी – 35
म.ज.म.अ. 155 दुरुस्ती – 12.
मतदार यादी अद्ययावतीकरण–
नविन मतदार नोंदणी( form no. 6 ) – 24, मयताचे नाव कमी करणे( form 7) – 09, मतदार यादीत नाव दुरुस्ती(form 8) – 06
संजय गांधी योजना DBT प्रक्रिया करणे– लाभार्थी- 216,
आरोग्य तपासणी शिबिरचा लाभ- ५४,
तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांचे मार्फत दिलेल्या सेवा- 67,
पुरवठा शाखा -शिधापत्रिका लाभ- 27
सेतू केंद्रमार्फत दिलेले लाभ–
उत्पन्न दाखले – 32, जातीचे दाखले-26
वय अधिवास व रहिवास दाखले – 12,
जननी सुरक्षा योजना लाभ – 33,
लेक लाडकी योजना – 07,
ICDS योजना – 8,
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप – 34,
जमिन आरोग्य पत्रिका वाटप – 07 असे
एकुण वाटप – 681

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या