Saturday, May 2, 2026
Homeजळगाववीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; आमदार चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांना दिला धीर,...

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; आमदार चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांना दिला धीर, शासनामार्फत चार लाखांची मदत वितरित

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; आमदार चंद्रकांत पाटील यांनी कुटुंबीयांना दिला धीर, शासनामार्फत चार लाखांची मदत वितरित

मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी        मुक्ताईनगर, ता. १६ जून   शेतकरी संकटांमध्ये अडकलेला असतोच; पण निसर्गाच्या कोपाने जेव्हा तो अचानक काळाच्या पडद्याआड जातो, तेव्हा त्यामागे उरते फक्त अश्रू आणि आठवणी…”
तालुक्यातील पुरणाड गावात १४ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास अशीच एक काळजाला भिडणारी घटना घडली. शेतात काम करत असताना आकाशातून अचानक वीज कोसळली आणि ४४ वर्षीय शेतकरी शांताराम शंकर कठोरे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने मृतकाच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सात्वन केले. दु:खद प्रसंगात शासनाकडून तत्काळ मदत मिळावी यासाठी त्यांनी सुटीचा दिवस असूनही प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यांच्या पुढाकारामुळे नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करण्यात आला आणि शासनाकडे सादर करण्यात आला.

या प्रस्तावाला शासनाने त्वरेने मंजुरी दिली असून, त्याअंतर्गत मयत शेतकरी शांताराम कठोरे यांची पत्नी भारती शांताराम कठोरे यांना चार लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. आज ही मदत आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते थेट त्यांच्या घरी जाऊन वारसांच्या हाती सुपूर्द करण्यात आली.

 

या वेळी तहसीलदार गिरीश वखारे, नायब तहसीलदार तलाठी काळे, सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव पाटील, मनोज पाटील, प्रफुल पाटील यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते. कठोरे कुटुंबियांच्या डोळ्यांत अश्रू होते; मात्र या मदतीमुळे त्यांना थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र होते.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी केवळ निधी मंजूर करून दिला नाही, तर स्वतः कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना आधार दिला. “या कठीण काळात आपण एकटे नाही, तुमच्या पाठीशी मी सदैव उभा आहे,” असे म्हणत त्यांनी सामाजिक संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतकरी कसा असुरक्षित आहे, हे अधोरेखित झाले. मात्र अशा प्रसंगी तात्काळ निर्णय घेणारे आणि जबाबदारी स्वीकारणारे लोकप्रतिनिधी हीच जनतेसाठी खरी आश्वासक शक्ती ठरते, असे ग्रामस्थांचे मत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या