Sunday, July 20, 2025
Homeनिवेदनयावल येथील स्मशानभूमी लाईट लावून स्वच्छता करण्याची तसेच शहरात कीटकनाशक फवारणी करण्याची...

यावल येथील स्मशानभूमी लाईट लावून स्वच्छता करण्याची तसेच शहरात कीटकनाशक फवारणी करण्याची मागणी केली मनसेने.

यावल येथील स्मशानभूमी लाईट लावून स्वच्छता करण्याची तसेच शहरात कीटकनाशक फवारणी करण्याची मागणी केली मनसेने.

यावर दि.१७. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल शहरातील हिंदू स्मशानभुमीतील लाईट लावणे व स्वच्छता ठेवणे तसेच यावल शहरात कीटकनाशक धुरफवारणी करणेची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली.

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दि.२७ जून २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आले आहे की यावल मध्ये जीवनाच्या रंगमंचावरील शेवट म्हणजे मृत्यु असे म्हणतात की, मृत्युची वाट ही कठीण असते. याचाच प्रत्यय आला यावल शहरातील वैकुंठधाम स्मशानभुमीत नागरिकांना यावल शहरात असलेल्या व्यास मंदीराच्या मागे वसलेल्या वैकुंठधाम स्मशानभूमी या ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही एकच हायमस्ट लावले आहे बाकी ठिकाणी लाईटची व्यवस्था नाही स्मशानभूमीत संध्याकाळी अग्नीडाग देताना पुरेसा प्रकाश नसतो,स्मशानभुमीतील गैरसोयीमुळे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येतो.संबंधित न.पा. प्रशासनाने स्मशानभुमीची योग्य देखभाल दुरुस्ती करावी व तसेच यावल शहरातील नाले सफाई झाली असून काही ठिकाणी न झाल्यासारखी आहे.तरी पुर्ण यावल शहरात नाले सफाई करून शहरात अस्वच्छतेमुळे डासांचा हिवतापाचे साथीच्या उद्रेक वाढला असून डेंग्यु, चिकनगुन्या,मलेरीया इत्यादी साथीचे आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.आजारांचे उद्रेक होत असतांना नगरपरिषद केवळ स्वच्छतेच्या नावाखाली धुळफेक करीत आहे.तरी यावल शहरात प्रत्येक प्रभागात धुर फवारणीचे नियोजन करावे त्यानुसार सकाळी धुरळणी व सायंकाळी फवारणी केली गेली पाहिजे व यावल शहरातील प्रत्येक वार्ड निहाय नियोजन करून डासांची उत्पत्ती नष्ट करण्याची प्रक्रिया राबवली पाहीजे लवकरच या सर्व मागण्या मान्य व नियोजन करण्यात यावे अन्यथा आम्हास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्यास भाग पाडू नका अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तिव्र आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष जनहित विभाग चेतन दिलीप आढळकर, किशोर नन्नवरे, गौरव कोळी,शाम पवार यांची स्वाक्षरी असून निवेदनाच्या प्रती आरोग्य मंत्री,मुंबई आयुक्त नाशिक,जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या