सांगवी बुद्रुक ग्रामपंचायत समोर एका ग्रामस्थाचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
यावल दि.१७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सांगवी बुद्रुक येथे श्री महर्षी वाल्मीक प्रवेशद्वार ठरलेल्या ठिकाणीच बांधकाम होण्यासाठी एका ग्रामस्थांने आज पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील रवींद्र रामभाऊ सोनवणे यांनी यावल तहसीलदार,पंचायत समिती गट विकास अधिकारी यावल, सांगवी बुद्रुक सरपंच व ग्रामसेवक तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी महर्षि वाल्मीक प्रवेश द्वार उभारणी साठी ज्या ठिकाणी तोंडी जागा
नियोजित करून दिलेली आहे त्याच ठिकाणी देण्यात यावी.
महर्षि वाल्मीक प्रवेश द्वारावर हरकत घेणारे अर्जदार आसिफ इस्माई मण्यार या अर्जदारणे जो अर्ज दिलेला आहे त्या अर्जावर केलेल्या स्वाक्षरीची पडताळणी, खात्री करून चौकशी करण्यात यावी यासाठी रवींद्र कोळी यांनी सांगवी बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. संबंधित अधिकारी या समोरून उपोषणाची कायद्याखाली घेतात याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधून आहे.