Thursday, June 19, 2025
Homeगुन्हापाच वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात भुसावळमध्ये पत्नीची...

पाच वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात भुसावळमध्ये पत्नीची पोलिसात फिर्याद

पाच वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ; पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात भुसावळमध्ये पत्नीची पोलिसात फिर्याद

भुसावळ, ता. १९ जून : खानदेश ला विनोद प्रतिनिधी
भुसावळ येथील मुस्लिम कॉलनीत राहत असलेल्या हिना बी आशीफ शाह (वय ३०) यांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात सततचा शारीरिक, मानसिक छळ व पैशांची मागणी केल्याच्या कारणावरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पाच जणांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे.

फिर्यादी हिना बी यांचा विवाह ६ मार्च २०१० रोजी सुरत येथील आशीफ शाह इजाज शाह यांच्याशी मुस्लिम रीतीने झाला होता. विवाहाच्या वेळी वडीलांनी सोन्याचे दागिने व संसारोपयोगी वस्तू दिल्या होत्या. सुरुवातीच्या काही वर्षांत योग्य वागणूक मिळाली, परंतु पुढील काळात पतीच्या दारूच्या व्यसनामुळे व सासरच्यांच्या टोमण्यांमुळे तिला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला.

तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, पती आशीफ शाह याने वेगवेगळ्या कारणांसाठी तिच्या वडिलांकडून २० हजार व नंतर ५० हजार रुपये मागून घेतले. दुचाकी खरेदीसाठी मागणी केल्यानंतर तिच्या माहेरच्यांनी भीतीपोटी पैसे दिले. मात्र त्यानंतरही छळ सुरूच राहिला.

फिर्यादीने पाच वर्षांपूर्वी सासरी झालेल्या कौटुंबिक वादानंतर मुलांसह माहेरी राहण्यास सुरुवात केली. या कालावधीत पती आशीफ शाह, सासू समाबी शाह, ननंद सलमाबी शाह, दुसरी ननंद शकली बी आणि तिचा पती फिरोज शाह यांनी वेळोवेळी पैशांची मागणी, शिवीगाळ, दमदाटी व मारहाणीचे प्रकार केले, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या