भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील गायत्री नगर येथील राजस्थान मार्बलजवळील गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी ३५ लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर बाजारपेठ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल शिरपूर येथून जप्त केला असून दोन संशयितांना अटक केली आहे.
फिर्यादी नंदलाल मिलकीराम मकडीया (रा. सिंधी कॉलनी, भुसावळ) यांच्या गोडाऊनचे शटर १५ जून रोजी रात्री उचकटून चोरट्यांनी प्रवेश केला होता. त्यानंतर फ्रिज, वॉशिंग मशीन, एसी, एलईडी टीव्ही आदी वस्तू चोरून नेल्या. १७ जून रोजी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.तपासादरम्यान पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शिरपूर शहरातील करवंद रोडवरील महावीर लॉन्स परिसरात एका खाजगी गोडाऊनमध्ये मुद्देमाल ठेवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकून पंचनामा करून १८ लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.या गोडाऊनचे मालक मुजावर जामील शेख चांद (वय ४८, रा. न्यु बोराडी, शिरपूर) व जफर शेख मुजावर (वय २४, रा. मुजावर मोहल्ला, शिरपूर) या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखा निरीक्षक संदीप पाटील आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात येथील पो हे कॉ उमाकांत पाटील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पो हे कॉ विजय नेरकर, पो हे कॉ संदीप धनगर, पो शि सचिन चौधरी, पो शि प्रशांत परदेशी, पो शि योगेश माळी, पो शि अमर अढाळे, पो शि प्रशांत सोनार, पो शि भुषण चौधरी, पो शि राहुल वानखेडे, पो शि जावेद शहा स्था गु शाखा पथक पो उप निरी श्री. शेखर डोगाळे, सहा फौज रवी नरवाडे, पो हे कॉ गोपाळ गव्हाळे, पो हे कॉ मुरलीधर धरगर, पो हे कॉ संदीप चव्हाण, पो हे कॉ प्रविण भालेराव, चालक भरत पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पो हे कॉ महेश चौधरी, पो शि राहुल भोई आदींचा समावेश होता.सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल टी. वाघ हे करीत आहेत.