Tuesday, June 24, 2025
Homeजळगावयावल येथील जे.टी.महाजन विद्यालय व बाल संस्कार विद्या मंदिरात योग दिवस मोठ्या...

यावल येथील जे.टी.महाजन विद्यालय व बाल संस्कार विद्या मंदिरात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

यावल येथील जे.टी.महाजन विद्यालय व बाल संस्कार विद्या मंदिरात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा.

यावल दि.२१  खानदेश नवीन न्यूज प्रतिनिधी
यावल येथील जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आणि बाल संस्कार विद्या मंदिरात योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज शनिवार दि.२१ जून २०२५ रोजी यावल येथील व्यास मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम व प्राचार्य रंजना महाजन मॅडम यांनी योगा दिवस निमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका सरोज येवले मॅडम यांनी केले.योगा दिनानिमित्त शाळेमध्ये शिक्षिका अर्चना पाटील व प्राजक्ता वाणी मॅडम यांनी प्राणायाम व विविध योगासनांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले या प्रशिक्षणासाठी पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे मॅडम व गौरी भिरुड मॅडम यांचे सहकार्य लाभले.

 


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ताडासन,भद्रासन,वृक्षासन, त्रिकोणासन,उष्ट्रासन,अर्धचंद्रासन, मंडूकासन,व विविध प्रकारचे प्राणायाम करून योग दिवसाचा आनंद घेतला.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले अशा प्रकारे योगा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याचप्रमाणे येथील बालसंस्कार माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लीए योग या थीमवर आधारित योगासने,प्राणायाम, आनंददायी गाणे विद्यार्थ्यांनी प्रशांत महाजन व नितीन बारी सर यांच्या मार्गदर्शनात केले.योग करताना मन,शरीर आणि आत्मा यांची योग्य सांगड कशी घालावी याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी यांनी विद्यार्थ्यांना सुचित केले.सदर कार्यक्रमात मनोगत माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अतुल गर्गे सर यांनी केले.सर्व शिक्षक बंधुभगिनी यांनी कृतीयुक्त सहभाग घेतला.योग दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष महेशभाऊ वाणी उपस्थित होते.श्री नारायण मार्तंड सार्वजनिक वाचनालय यावल यांच्या प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.त्यात वाचनालयाचे महेश सराफ यांनी तसेच सर्व संचालक मंडळ यांनी सहकार्य केले.योग करतांना विद्यार्थ्यांनी योगाचा आनंद घेतला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या