Tuesday, June 24, 2025
Homeकृषीयावल शिवारात शेती साहित्य चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान.

यावल शिवारात शेती साहित्य चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान.

यावल शिवारात शेती साहित्य चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान.

यावल दि.२१  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शेती साहित्य चोरीला जात असल्यामुळे यावल शिवारातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान आणि दैनंदिन कामकाजात अडथळे निर्माण होत असल्याने यावल पोलिसांनी शेती साहित्य चोरणाऱ्या भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की शुक्रवार दि.२० जून २०२५ चे रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी यावल भुसावल रोडवरील रजा पेट्रोल पंपा जवळील रामराव शिंदे यांच्या शेतातील इलेक्ट्रिक सामानाची तोडफोड करून ट्यूब वेलची केबल कापून चोरून नेल्याने रामराव शिंदे यांचे आर्थिक नुकसान झाले आहे पर्यायी पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी अडथळा निर्माण झाला. याचप्रमाणे इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांसह ठिबक संचाच्या नळ्या,पीव्हीसी पाईप व इतर साहित्य अज्ञात चोरटे चोरून नेत असल्याने यावल पोलिसांनी तसेच पीक संरक्षण सोसायटी यांनी या भुरट्या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या