छोटूलाल चव्हाण यांच्या हर्षयोगी काव्यसग्रहाला “साहित्य सन्मान” पुरस्कार प्रदान

पाल ता रावेर : खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
– रावेर तालुक्यातील पाल येथील कवि छोटूलाल चव्हाण यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या “हर्षयोगी” या शैक्षणिक, भौगोलिक, ऐतिहासिक, सामाजिक, अध्यात्मिक, सास्कृतिक विषयाला अनुसरून लेखन केलेल्या बहारदार कवितेचा काव्यसंग्रहाला जळगाव येथील आय एम आर कॉलेजच्या ऑडिटोरियन हॉल मध्ये काव्यकलश सन्मान कर्तृत्वाचा सोहळा संपन्न झाला आहे .
– गौरवाचा साहित्यरंग साहित्य मंच नाशिक आयोजित कविसंमेलन व सन्मान सोहळ्यात दि 22 जून रोजी “साहित्य सन्मान पुरस्कार” देण्यात आले.
– या संमेलनाचे अध्यक्ष श्री यशवंत हिराबाई त्रंबक पगारे हे होते. तसेच उदघाटक जेष्ठ साहित्यिका सौ इंदिरा जाधव, होत्या तर स्वागतध्यक्ष कवि, लेखक सुधीर महाजन, होते
– कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माजी सोशल आमदार राष्ट्रीय मानव सेवाधिकार मुंबई चे मदनराव कुलकर्णी, जेष्ठ कवयित्री जनाबाई हिरे, लेखक प्रकाश पाटील,विजय पाटील, सुशीर शिंदे या प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
– यावेळी कवि संमेलनात या हर्षयोगी काव्य संग्रहाचे कौतुक करण्यात आले.
– हा काव्य संग्रह खरोखरच नवोदित कविंना प्रेरणा देणार व वाचकांना उपयुक्त असा ठरणार आहे . यावेळी मान्यवरांनी छोटूलाल चव्हाण यांची प्रशंसा केली व ग्रामिण परिसरातही कविता करण्याचा छंद आबादित ठेवल्या बद्दल अभिनंदन केले आहे .
–

