Monday, June 30, 2025
Homeगुन्हाशहरातील नगरपालिका परिसरात गावठी कट्टा घेवून दहशत माजवणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !

शहरातील नगरपालिका परिसरात गावठी कट्टा घेवून दहशत माजवणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !

शहरातील नगरपालिका परिसरात गावठी कट्टा घेवून दहशत माजवणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या !

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. मधुकर साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शहरात नगरपालिकेच्या मागे कमरेला गावठी कट्टा लावुन दहशत निर्माण करणाऱ्या अमळनेरातील २१ वर्षीय तरुणास शहर पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील नगरपालिकेच्या पाठीमागील कब्रस्थानाजवळ एक तरुण कमरेला गावठी कट्टा लावून दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी अमळनेर येथील जुन्या पारधी वाड्यामधील संशयित कार्तीक रवींद्र पवार (वय २१) यास ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला ४० हजारांचा एक गावठी कट्टा आढळून आला. त्यानंतर कार्तिक पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुध्द चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स.पो.नि. एकनाथ भिसे करत आहेत. ही कारवाई सपोनि एकनाथ भिसे, स. फौ. जितेंद्र सोनवणे, दीपक विसावे, पो.हे.कॉ. संतोष पारधी, पो. हे. कॉ. ज्ञानेश्वर जवागे, हर्षल पाटील, पो.ना. संदिप भोई, पो.कॉ. विनोद पाटील, नीलेश वाघ, प्रकाश मधुरे, प्रमोद पवार यांनी केली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या