Saturday, May 2, 2026
Homeगुन्हाधक्कादायक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल...

धक्कादायक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल !

धक्कादायक : मध्यरात्री घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न ; गुन्हा दाखल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलगी घरात झोपलेली असताना तिचा विनयभंग करीत अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीने विरोध केला असता जिवे मारण्याची धमकी दिली. हा धक्कादायक प्रकार ३० जून रोजी रात्री घडला आहे. याप्रकरणी सूर्यभान प्रकाश सपकाळे (रा. कानळदा, ता. जळगाव) याच्याविरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात १ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह राहते. ३० जून रोजी रात्री ती घरात झोपलेली असताना सूर्यभान सपकाळे हा घरात घुसला व मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मुलीचे कपडेदेखील त्याने फाडले. मुलीने विरोध केला असता तिला शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सूर्यभान सपकाळे याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. अनंत अहिरे करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या