यावल येथे पहेरन शरीफ मिरवणूक कोणतेही वाद्य न वाजविता काढणार : पहेरन शरीफ कमिटीचा कौतुकास्पद निर्णय!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – यावल शहरात संपूर्ण मुस्लिम बांधव गुरुवार दि.१० जुलै २०२५ रोजी पहेरन शरीफ मिरवणूक सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात काढणार आहे,परंतु त्यादिवशी यावल शहरात व्यासपौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा हा उत्सव सुद्धा साजरा होणार असल्याने हिंदू -मुस्लिम बांधवांच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन मुस्लिम बांधवांनी तसेच पहेरन शरीफ कमिटीने मिरवणूक काढताना कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजविणार नसल्याचा महत्त्वपूर्ण, कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.यावल पोलिसांकडे दिलेल्या परवानगी अर्जात पहेरन उत्सव कमिटीने नमूद केले आहे की यावल शहरात दि.१० जुलै २०२५ रोजी बाबूजीपुरा मोहल्लातून पहेरन शरीफ मिरवणूक कार्यक्रम सकाळी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत उत्सव साजरा करीत असून ही मिरवणूक विनावाद्य बँड वाजे वगैरे न लावता काढणार आहोत मिरवणुकीत एकही वाद्य,बँड राहणार नाही.असे पहेरन शरीफ कमिटी अध्यक्ष शेख नईम शेख शरीफ यांनी नमूद केले आहे.
पहेरन शरीफ उत्सव मोठ्या उत्साहात शांततेत साजरा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी एक पहेरन शरीफ कमिटी स्थापन केली असून अध्यक्ष- शेख नईम शेख शरीफ उपाध्यक्ष- मोहसिन खान, शेख शाहीर,सचिव- निसारुद्दीन, सहसचिव इरफान खान तर सभासद म्हणून नसीरुद्दीनशाहबुद्दीन,शेख हबीब गुलाम रसूल,इरफान खान अलियार खान,इस्माइल खान महेमूद खान,रियाझुद्दीन शेख सलीम,रिझवान शेख कुतबुद्दीन,मुस्तफा खान महेबूब खान,सय्यद फिरोज सय्यद अहमद शकूर युसुफ खान,शेख अखलाक शेख खलील,गुलाम गौस शेख नबी,नायिम युनुझ खाटिक,वसीम खान नासिर खान,अन्सारुद्दीन इसररुद्दीन अरब मसूद सईद,युनुस बिस्मिल्लाह पिंजरी,अनिस युसुफ पिंजरी,इम्रान खान रिझवान खान, शेख मोहसीन शेख कालू, शेख अनीस शेख असलम,अक्रम खान अजमल खान याप्रमाणे सभासद आहेत.