हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९.८ मिमी सरासरी पावसाची नोंद ; ८ दरवाजांतून २४० क्युमेसेक विसर्ग !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी ९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून, चिखलदरा येथे सर्वाधिक ४४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यासोबतच धरणात पाणीसाठा वाढत असल्याने ८ दरवाजांतून २४० क्युमेसेक (८४७६ क्युसेक) पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ब-हाणपूर – ४.०, देढतलाई – १८.४, टेक्सा – ३.४, एरडी – ०.६, गोपालखेडा – ४.२, चिखलदरा – ४४.०, लखपुरी – ७.२, लोहारा – ३.४, अकोला – ३.२ अशी एकूण ८८.४ मि.मी. पर्जन्यमान नोंद करण्यात आली असून सरासरी पर्जन्यमान ९.८ मि.मी. इतके आहे.
धरणाची सद्यस्थिती:
सद्य पाणीपातळी – २१०.४४० मीटर
पूर्ण क्षमतेची पातळी – २१४.०० मीटर
एकूण साठा – २११.६० द.ल.घ.मी. (५४.५४ टक्के)
जिवंत साठा – ७८.६० द.ल.घ.मी. (३०.८२टक्के)
विसर्ग स्थिती:
८ दरवाजे प्रत्येकी ०.५० मीटरने उघडलेले असून, त्यातून २४० क्युमेसेक विसर्ग सुरू आहे.
कालवा व रेजिड्युअल गेटमधून सध्या कोणताही विसर्ग नाही.
आज गुरुवारी पावसाची १ मिमी, तर यंदाच्या हंगामात एकूण पावसाची १९२ मिमी नोंद झाली आहे.धरण क्षेत्रात पाऊस मध्यम स्वरूपाचा असून, पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आगामी काही दिवसांत अधिक पावसाची शक्यता असून, यामुळे धरणाच्या पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.प्रशासन व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

