जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी इंदोर हैदराबाद 753 एल या महामार्गाच्या जमिनीच्या मोबदल्यासाठी आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवार रोजी आक्रमक पवित्रा घेत शेतकरी व त्यांचे कुटुंबिया समवेत जलसमाधी आंदोलन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे .
खामखेडा पूर्णा नदी पुलावर महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग 753 एल बाधित शेतकरी संघर्ष समिती मुक्ताईनगर यांनी अंतुर्ली मुक्ताईनगर व सातोड चालू असलेले रस्त्याचे काम योग्य मोबदला न दिल्यामुळे जलसमाधी आंदोलन केले .
यावेळी शेतकरी न्याय हक्कासाठी सर्व राजकीय पक्ष व सर्व समाज बांधव व शेतकरी बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे .
गेल्या तीन ते चार महिन्यापासून जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे मुक्ताईनगर येथील खामखेडा पुलावर २५० शेतकरी यांचे उपोषण सुरू होते .
यासंदर्भात अनेक वेळा मंत्र्यांसोबत देखील बैठका झाल्या परंतु त्या निष्फळ ठरत असल्याने शेवटी कंटाळून शेतकऱ्यांनी रविवारी त्यांच्या कुटुंबीयासमवेत जलसमाधी आंदोलन केले .

यावेळी आंदोलनाला काही वेळ उग्र स्वरूप आले होते .
पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौज फाटा यावेळी तैनात होता तसेच रुग्णवाहिका व आरोग्य यंत्रणा देखील सक्रिय होती. महसूल विभागाचे कर्मचारी देखील हजर होते.
पोलिसांचा बंदोबस्त मोठा असल्याने शेतकरी यांना पाण्यात उतरू दिले नाही. दोन शेतकरी यांना आंदोलनादरम्यान ब्लड प्रेशर कमी जास्त झाल्याने चक्कर आले होते त्यातील एका शेतकऱ्याला रुग्णवाहिकेत दवाखान्यात पाठविण्यात आले. आंदोलनादरम्यान तहसीलदार यांनी शेतकरी संघर्ष समितीला पत्र दिले.
पत्रामध्ये असे नमूद होते की यापुढे खामखेडा पुलाचे काम सुरू राहील इतरत्र सुरू असलेली रस्त्याची कामे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत बंद राहील.

आमदार चंद्रकांत पाटील हे देखील या जलसमाधी आंदोलनात सहभागी झाले होते यावेळी माध्यमांसमोर माहिती देताना ते म्हणाले की, चार महिन्यापासून शेतकरी आंदोलनास बसले आहे. शेतकरी जमिनी देण्यास तयार आहे परंतु त्याचा मोबदला योग्य मिळावा बळीराजा देशाच्या केंद्रस्थानी आहे . परंतु अशा पद्धतीने शेतकऱ्यांवरच जर अन्याय होत असेल तर ही बाब योग्य नाही जोपर्यंत मोबदला योग्य मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच असेल ज्या लोकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे त्यांच्या बागायती जमिनी असून शासनाकडून त्यासाठी कवडीमोल भावात जमिनीचा मोबदला दिला असल्याने शेतकरी आंदोलन करीत आहे .

