माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी प्रांताधिकारी कार्यालयात गैर वर्तणूक केल्याने महसूल कर्मचाऱ्यांचे काळेफिती लावून कामकाज.
कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडणार…
यावल दि.१७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर यांच्या कार्यालयात फैजपूर नगरपरिषद माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंटू राणे यांनी गैरवर्तणूक केल्यामुळे रावेर यावल तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटनांनी काळ्याफिती लावून कामकाज सुरू केले तसेच गैरवर्तणूक केली म्हणून कारवाई न झाल्यास महसूल कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे आज गुरुवार दि.१७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात महसूल कर्मचारी संघटनांनी नमूद केले आहे की रावेर यावल तहसिलदार नायब तहसिलदार रावेर / यावल,महसुल
कर्मचारी संघटना,ग्राम महसुल अधिकारी संघटना,महसुल सेवक संघटना,चतुर्थ श्रेणी कर्मचारी
संघटना यावल / रावेर, यांचेकडुन निवेदन देण्यात येते की, काल दिनांक १६/०७/२०२५ रोजी कार्यालयन वेळेत पूर्व- परवानगी न घेता निलेश राणे नामक व्यक्ती यांनी उपविभागीय अधिकारी तथा बबनराव काकडे यांचे दालनात बेकायदा प्रवेश करुन कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांच्या मोबाईल मध्ये व्हीडीओ चित्रीकरण करत असतांना अर्वाच्च भाषेचा वापर करुन कोणताही व्यक्ती तुमच्याकडे काम घेऊन आला तर तुम्ही फक्त कागद व लॅपटॉप हलवता अशा भाषेचा वापर केला.बऱ्याच ऑनलाईन मिटींग व व्हीसी असल्यामुळे
दालनाचा दरवाजा बंद असतो त्यांनी असे म्हटले की,या पुढे जर दालनाचा दरवाजा बंद दिसला तर लाथेने दरवाजा तोडीन अशी धमकी देऊन ऐकेरी व आरेरावीची भाषा वापरुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.सदर व्यक्तीने या पुर्वी देखील बऱ्याच वेळेस व बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये जाऊन अशाच प्रकारे अरेरावीची भाषा करुन शासकीय कर्मचारी यांना वेठीस धरतात व प्रत्येकी मोबाइलद्वारे चित्रफित बनवुन
सरकारी कर्मचारी यांना धमक्या देऊन तुमच्या खोट्या तक्रारी लाचलुचपत विभागात देईन अशा धमक्या देतात.सदर व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सुध्दा वेठीस धरतात यामुळे शासकीय काम करत असतांना सरकारी कर्मचारी / अधिकारी यांच्यात सदर व्यक्तीमुळे भितीचे वातावरण
निर्माण झाले आहे. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी दडपणाखाली काम करत आहे. व त्याचा विपरीत परिणाम शासकीय कामाच्या गुणवत्तेवर दिसुन येतो.
वरील विषयाच्या निषेधातं आम्ही वरील अधिकारी व कर्मचारी संघटना आज गुरुवार दि.१७ जुलै
२०२५ रोजी काळया फिती लाऊन कामकाज करत असुन सदर व्यक्तीवर कार्यवाही न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा यावल रावेर तालुक्यातील महसूल संघटना सर्व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.याबाबत जिल्हाधिकारी काय कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
महसूलची कडून दिरंगाई,
हलगर्जीपणा,आणि कर्तव्यात कसूर.
महसूलची कडून दिरंगाई,
हलगर्जीपणा,आणि कर्तव्यात कसूर.
यावल तालुक्यातील अमोदा शिवारातील मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीवरील गौण खनिज शासनाचे परवानगी विना चोरी करून विक्री केल्याची तक्रार फैजपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी २९ एप्रिल २०२४, ३० जुलै २०२४,३ सप्टेंबर २०२४, ३१ जानेवारी २०२५, यांनी करून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे तसेच या संदर्भात आमदार सुरेश दामू भोळे उर्फ राजू मामा भोळे यांनी १७ एप्रिल २०२५ रोजी महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे सुद्धा लेखी पत्र देऊन या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे तरी सुद्धा फैजपूर भागाचे प्रांताधिकारी आणि यावल तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही याबाबत सतत पाठपुरावा केला आहे आणि काय कारवाई केली याबाबतचे विचारणा करण्यासाठी कार्यालयात गेलो असता सतत पाठपुरावा करीत असल्याचे वाईट वाटून महसूल कर्मचाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढून माझ्याविरुद्ध कुटिल डावपेच आणि षडयंत्र रचून गैरवर्तणूक केल्याचा खोटा आरोप केल्याची माहिती माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांनी दिली.