सत्ताधाऱ्यांचा माज उतरवणार
ओबीसी जिल्हाध्यक्ष सचिन पाटील
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांमध्ये जे काही हनी टॅप सारखे स्कॅन्डल चालू आहे त्यांचा माज उतरविणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार गट ) ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष सचिन भास्कर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले आहे .
माजी आमदार संतोष चौधरी यांच्या निवासस्थानी संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत माजी नगरसेवक दुर्गेश ठाकूर , उल्हास पगारे , युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयेश चौधरी , हाजी शेख जाकीर , राजु भोई , शेख साजिद , दिपक मराठे , नरसिंग तायडे आदी उपस्थित होते .
पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष आ शशिकांत शिंदे , सरचिटणीस रोहीत पवार , व राजापूर कर यांनी पुणे येथील कार्यकारीणी बैठकित माझी ओबीसी जळगांव जिल्हाध्यक्ष पदी निवड केली . मी माजी आमदार संतोष चौधरी , प्रमोद पाटील व राजेंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाने जिल्हाभर राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे काम करणार आहे .
सत्ताधारी नेत्या मध्ये जे काही हॅनी टॅप सारखे स्कॅन्डल सुरू आहे . त्यांचा माज मी उतरविणार आहे असे सचिन पाटील यांनी सांगितले .
या प्रसंगी उल्हास पगारे व दुर्गेश ठाकूर यांनी पक्ष वाढीसाठी सचिन पाटील यांना सर्वत्र सहकार्य करणार असल्याचे सांगितले .