Thursday, January 29, 2026
Homeजळगावजे ई स्कूल व ज्यु. कॉ. मुक्ताईनगर मध्ये. सांस्कृतिक महोत्सवात कलाकारांनी केली...

जे ई स्कूल व ज्यु. कॉ. मुक्ताईनगर मध्ये. सांस्कृतिक महोत्सवात कलाकारांनी केली धमाल

जे ई स्कूल व ज्यु. कॉ. मुक्ताईनगर मध्ये. सांस्कृतिक महोत्सवात कलाकारांनी केली धमाल

मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी          26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जे ई स्कूल आणि ज्यु कॉलेज मुक्ताईनगर येथे वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.दि 21 ते 26 जानेवारी दरम्यान आयोजित या महोत्सवात विविध उपक्रमामध्ये मुला मुलींनी मोठया संख्येत सहभाग नोंदवून धमाल केली.
विधान परिषद सदस्य आ. एकनाथराव खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रसंगी संस्थेच्या चेअरमन ॲड रोहिणीताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.याआधी उपशिक्षक एस आर ठाकूर यांनी संविधान प्रास्ताविकासह, असाक्षरता, तंबाखूमुक्त शाळा याविषयी शपथ उपस्थितांना दिली.
त्यानंतर आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ.एकनाथराव खडसे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री ना. श्रीमती रक्षाताई खडसे, बालभारती पाठ्य पुस्तक मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील भुसावळ,संस्थेच्या चेअरमन ॲड रोहिणीताई खडसे , उपाध्यक्ष नारायणदादा चौधरी,सचिव डॉ सी एस चौधरी,संचालक पुरुषोत्तम महाजन, महेश दादा पाटील, रमेशभाऊ खाचणे, प्राचार्य विकास चौधरी, सांस्कृतिक कार्यक्रम अध्यक्षा सौ योगिता पाटील यांचेसह मुख्याध्यापक आर वाय सोनवणे, मुख्याध्यापिका श्रीमती चित्रा भारंबे आदी उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय एस. आर. ठाकूर यांनी केला..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विकास चौधरी यांनी केले.स्पर्धेच्या युगात शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा घेत असलेले विविध उपक्रम ,विविध स्पर्धा परीक्षा याविषयी माहिती दिली. त्यानंतर कु देवश्री विकास पाटील हिने *ईस्ट अँड वेस्ट, जे ई स्कूल इज द बेस्ट* याविषयी खास प्रभावी वक्तृत्व शैलीत व्यक्त केलेले मनोगत उपस्थितांचे मन जिंकून गेले.
प्रसंगी इ. १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थी,राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थी , एनसीसी बेस्टकॅडेट,आदर्श विद्यार्थी तसेच वेग वेगळ्या स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना रोख बक्षीस,प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.तसेच सन्माननीय संचालकांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शाळेचे ” झेप ” हस्तलिखिताचे प्रकाशन ऍड रोहिणीताई खडसे व मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले.याशिवाय हरित सेनेअंतर्गत-इकोक्लब, वृक्ष संवर्धन,तंबाखू मुक्त शाळा , गांधीतीर्थ फाउंडेशन आणि मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ-सुंदर शाळा या सारख्या उपक्रमात विशेष योगदान दिल्याबद्दल उपशिक्षक शिवाजीराव वंजारी यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर डॉ जगदीश पाटील यांनी मौलिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले, प्रसंगी श्रवण, वाचन, लेखन सारख्या9 गोष्टींकडे आपले लक्ष केंद्रित करून आपला सर्वांगीण विकास साधावा,त्यासाठी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात? आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात..?? या बाबत मार्गदर्शन केले.अभ्यासा बरोबरच ताणतणावाचे नियोजन करण्याबाबत त्यानी आव्हान केले. त्यानंतर विविधता पूर्ण अशा सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलांनी सुंदर असा कलाविष्कार सादर करून9 उपस्थित मान्यवर तथा पालकांची मने जिंकली.शेवटी मुलांसह सर्व शिक्षकांनीही ठेका धरत कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. कला शिक्षिका श्रीमती अर्चना भोळे यांनी रंगमांचा समोरील काढलेली ” भगवान बुद्ध ” यांची अतिशय सुरेख, मनमोहक कलाकृती सर्वाना भावली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य.व्ही.एम.चौधरी यांचे मार्गदर्शनाखली उपप्राचार्या व्ही.के.शिर्के,पर्यवेक्षक व्ही.डी.ब-हाटे,के.आर.कवळे,एस पी राठोड, सांस्कृतिक मंडळ प्रमुखoo सौ.वाय.एस.पाटील,उपप्रमुख बी.एम.कोल्हे सचिव व्ही.एस.राणे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.आर.व्ही.महाजन व आर.डी.भोळे मॅडम यांनी केले.वंन्दे मातरम् राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या