Thursday, January 29, 2026
Homeगुन्हाशेअर ट्रेडिंगविषयी माहिती शोधली अन् तब्बल एक कोटी ३५ लाखांची झाली ऑनलाइन...

शेअर ट्रेडिंगविषयी माहिती शोधली अन् तब्बल एक कोटी ३५ लाखांची झाली ऑनलाइन फसवणूक !

शेअर ट्रेडिंगविषयी माहिती शोधली अन् तब्बल एक कोटी ३५ लाखांची झाली ऑनलाइन फसवणूक !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज नेटवर्क – शेअर ट्रेडिंगविषयी इंटरनेटवर माहिती शोधली अन् अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडल्याने शहरातील एका सेवानिवृत्ताची तब्बल एक कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी २७ जानेवारी रोजी सायबर पोलिस ठाण्यात चार अनोळखींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, एका खासगी कंपनीतून निवृत्त झालेले, तिवारी नगरातील रहिवासी ६१ वर्षीय वृद्धाने ३१ ऑगस्ट रोजी ऑनलाइन शेअर ट्रेडिंगविषयी माहिती शोधली. तेथे दिसलेल्या एका व्हॉट्सअॅप लिंकला त्यांनी क्लिक केले असता एका ग्रुपमध्ये ते जोडले गेले. त्यात त्यांना शेअरविषयी माहिती देण्यात येवू लागली त्यानंतर एका शेअरमधील गुंतवणूकविषयी लिंक पाठविली. त्यावरील सुचनेनुसार पैसे भरुनही नफा तर दूरच मात्र भरलेले १ कोटी ३५ लाख ८५ हजार १८९ रुपये देखील मिळाले नाही.सेवानिवृत्ताने २५ सप्टेंबर रोजी ५० हजार रुपये शेअरमधील गुंतवणुकीसाठी ऑनलाइन पाठविले. त्यावर अधिक नफा होत असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी ७८ लाख ३५ हजार रुपये शेअर खरेदीसाठी पाठविले. त्यावर त्यांना ४ कोटी ४२ लाख ९८ हजार ३३८ रुपये जमा झाल्याचे दिसत होते. ती रक्कम काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला असता त्यांना समोरील महिलेने १० टक्के सव्र्व्हस टॅक्स भरण्यास सांगितला. तो त्यांनी भरला. त्यानंतर पुन्हा १५ टक्के कॅपिटल गेन टॅक्स भरण्यास सांगितल्याने त्यांनी २६ नोव्हेंबर रोजी ५ लाख, ३० नोव्हेंबर रोजी ८ लाख २२ हजार ३७५ रुपये ऑनलाइन पाठविले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या