Saturday, May 2, 2026
Homeजळगाव येथे उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप

 येथे उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप

येथे उर्दू शाळेत विद्यार्थ्यांना लेखन साहित्य वाटप

फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

शाळेतील अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सामना करावा लागतो. याचा परिणाम शिक्षणावर होतो त्यासाठी आम्ही दरवर्षी शालेय साहित्य वाटप करीत असतो असे आमोदे, ता. यावल येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख मोहम्मद शेख करीम पिंजारी यांनी सांगितले. येथील जिल्हा परिषद उर्दू शाळेत लेखक साहित्य वाटप कार्यक्रम थाटामाटात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी आशिक हुसेन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख गौसखान हबीबुल्ला खान होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महमूद नवाब तडवी व पदाधिकारी, हारून समद पिंजारी, सलीम बाबू पिंजारी, गुलाब खलील तडवी आदी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद मुमताज अली असलम खान, गुलाब खान यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक शेख मोहम्मद शेख करीम पिंजारी यांनी मांनले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या