Saturday, May 2, 2026
Homeजळगावपिंपळगाव खु . येथे सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज उतरविला नाही .

पिंपळगाव खु . येथे सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज उतरविला नाही .

पिंपळगाव खु . येथे सूर्यास्तानंतर राष्ट्रध्वज उतरविला नाही .
युवा सेनेचे अध्यक्ष राणे यांची तक्रार

भुसावळ  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे ग्रामपंचायत प्रांगणात  १ में  महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वज सूर्यास्तानंतरही न उतरवल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत ग्रामपंचायत सदस्य तसेच युवा सेनेचे तालुकाध्यक्ष विष्णू राणे यांनी तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनी गावात मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला होता. मात्र, सूर्यास्त झाल्यानंतरही राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात आला नाही. ग्राम पंचायत सदस्य विष्णू राणे हे बाहेरगावी गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी तात्काळ संबंधित जबाबदार व्यक्तींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी संबंधित व्यक्तींनी आपण गावाबाहेर असल्याचे सांगितले. दरम्यान, या संपूर्ण घटनेचं चित्रण  विष्णू राणे यांनी तयार करून तक्रार केली आहे.
राष्ट्रध्वजाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी युवा सेनेचे तालुका अध्यक्ष विष्णू राणे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या