कॉंग्रेसला बसला धक्का : प्रतिभा शिंदेंनी सोडली साथ !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आगामी मनपा, जि.प. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात खिळखिळी झालेली संघटना उभी करण्याच्या काँग्रेसच्या तयारीला धक्का बसला असून, काँग्रेसच्या उपाध्यक्षा प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. सोमवार, ११ ऑगस्ट रोजी शिंदे यांनी आपला राजीनामा प्रदेश अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे.
दरम्यान, शिंदे यांनी आपल्या राजीनाम्याबाबत जाहीररीत्या कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, शिंदे लवकरच राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. याबाबत ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. आदिवासींसह इतर वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रतिभा शिंदे यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता