Friday, September 5, 2025
Homeजळगावराष्ट्रवादी महिला व युवतीच्या वतीने सजग सक्षम हेल्पलाईन सेवा कार्यान्वित

राष्ट्रवादी महिला व युवतीच्या वतीने सजग सक्षम हेल्पलाईन सेवा कार्यान्वित

पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला शुभारंभ

जळगाव  खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  – शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचाव्यात तसेच महिलांना घरगुती हिंसाचार,युवतींना शैक्षणिक अडचणीत थेट मदत व्हावी म्हणून राष्ट्रवादी महिला व युवती काँग्रेसच्या वतीने संपूर्ण आठवडाभर २४ तास मदत करता येणारी हेल्पलाईन सेवा सुरु करण्यात आली.राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.याचवेळी अजितदादा पवार यांना विविध जाती व पंथांच्या युवतींकडून राख्या बांधून सामाजिक समरसता रक्षाबंधन सुद्धा साजरे करण्यात आले.
अजितदादा पवार हे आज १७ ऑगस्ट (रविवार) रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते, त्यानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कु.भाग्यश्री विवेक ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या सेवेच्या बोधचिन्हाचे अनावरण ना.पवार यांनी केले. अजितदादा पवार यांनी उपक्रम कसा कार्यान्वित होणार असून महिला व युवती संघटना पक्षाच्या माध्यमातून लोकांना कशी सेवा देणार आहेत याबाबत समजून घेत राष्ट्रवादी महिला व युवती हेल्पलाईन उपक्रमासाठी पक्षाकडून सर्व पद्धतीची मदत केली जाईल,असे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी आमदार अनिलदादा पाटील,माजी आमदार मनीषदादा जैन,रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील,महानगर अध्यक्षा मीनल पाटील,युवती काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा अभिलाषा रोकडे, रावेर लोकसभा अध्यक्षा कु.भाग्यश्री विवेक ठाकरे, जळगाव जिल्हाध्यक्षा मोनालिका पवार,महिला जिल्हा कार्याध्यक्षा लता राठोड,जिल्हा उपाध्यक्ष ललिता बारी, शहर कार्याध्यक्षा लता मोरे, चाळीसगाव तालुकाध्यक्षा सोनाली पाटील,जळगाव तालुकाध्यक्ष साधना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

अचानक रस्त्यावर उभारला कार्यक्रम

शिरसोली रस्त्यावरील जुना जकात नाका येथे महिला व युवती काँग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मदतकक्षाच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि सामाजिक समरसता रक्षाबंधन अशा दोन सामाजिक कार्यक्रमांचे अचानक रातोरात मंडप,स्वागतगेट व रांगोळी वैगरे टाकुन शानदार आयोजन केले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाहनांच्या ताफ्याला जैन हिल्स येथून सकाळीच शहरात येतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे झेंडे दाखवत महिला व युवतींनी कार्यक्रमासाठी थांबविल्याने ना.पवार यांनी उपस्थितांचा आग्रह न मोडता कार्यक्रमाला व्यस्ततेतुन दहा-पंधरा मिनिटे दिल्याने सर्व पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

रक्षाबंधन कार्यक्रमातून सामाजिक समरसता
अजितदादा पवार यांना नम्रता बोदडे,राहत बाबू खाटीक,भूमिका सपकाळे,प्राची गोकुळ चव्हाण, लावण्या दीपक पवार,प्रिन्सी दारा, जयश्री तांबे अशा हिंदू, मुस्लिम,बौद्ध, बंजारा, सिंधी व ब्राम्हण या विविध धर्म आणि पंथांच्या युवतींनी राख्या बांधल्या.महिला व युवती काँग्रेसच्या या सामाजिक समरसता रक्षाबंधन कार्यक्रमाचे अजितदादा पवार यांनी कौतुक केल्याने याबद्दल दिवसभर चर्चा होती.यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या योजना पाटील,ललिता पाटील,आशा पाटील,सीमा पाटील छाया पाटील,मथुराबाई बारी,प्रमिला बारी,जिजाबाई माळी व युवती काँग्रेसच्या युवती काँग्रेसच्या तेजस्विनी धनगर,अनुष्का कोळी, स्वामिनी पाटील,श्रद्धा पाटील आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या