Wednesday, April 29, 2026
Homeआरोग्यमायेची सावली’ पुस्तक मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना भेट

मायेची सावली’ पुस्तक मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना भेट

‘मायेची सावली’ पुस्तक मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना भेट

मुक्ताईनगर :     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी       जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन विविध विभागांची पाहणी केली. रुग्णालयातील सेवा व सोयींबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

याच दौऱ्यात पत्रकार छबीलदास पाटील यांनी स्वतः लिहिलेलं हृदयस्पर्शी आणि कुटुंबमूल्यांवर आधारित ‘मायेची सावली’ हे पुस्तक मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांना भेट दिलं. पुस्तक स्वीकारताना करनवाल यांनी या लेखन कार्याचे कौतुक करीत लेखकाला शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी मुक्ताईनगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे, पत्रकार संदीप जोगी, अमोल वैद्य, निलेश मेढे, सचिन झनके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. छोटेखानी या कार्यक्रमात ‘मायेची सावली’ या पुस्तकाला मान्यवरांकडून विशेष प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या