रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनची नवीन कार्यकारिणी जाहीर


रावेर तालुका खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
अध्यक्षपदी विजय गोपाल चौधरी, सचिवपदी प्रकाश ज्ञानेश्वर चौधरी यांची निवड
रावेर : रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनची वार्षिक सभा दत्तगुरु लॉन्स, रावेर येथे नुकतीच उत्साहात पार पडली. या सभेत आगामी कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भाऊ भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सचिव अनिल भाऊ झवर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली.
यावेळी रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी विजय गोपाल चौधरी (त्रिमूर्ती मेडिकल) यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सर्वेश किशोर लोमटे (श्रीहरी मेडिकल, सावदा), सचिवपदी प्रकाश ज्ञानेश्वर चौधरी (कोमल मेडिकल) तर खजिनदारपदी निलेश यादव महाजन (साई श्रद्धा मेडिकल) सहसचिव पदी पवन किशोर पाटील (सूर्या मेडिकल), व अंशुल ज्ञानेश्वर महाजन ( ज्ञानछाया डिस्ट्रिब्युटर), सोशल मीडिया प्रमुखपदी संकेत पाटील (संकेत फार्मा अँड मेडिकल)यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून मनोज महाजन, प्रमोद महाजन रुपेश चौधरी निकीत परदेशी भरत येवले अंकुश महाजन ललित पाटील मुदस्सिर शेख यांची निवड करण्यात आली.
यावेळी रावेर तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष गोविंद महाजन, माजी उपाध्यक्ष गुणवंत भंगाळे, माजी सचिव प्रवीण सरोदे, माजी खजिनदार लखन सावळे, माजी अध्यक्ष संजय चौधरी, दीपक लोमटे तसेच इतर माजी कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा नवनिर्वाचित कार्यकारिणीला लाभ झाला. तसेच तालुक्यातील केमिस्ट बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयएमए रावेर तालुका अध्यक्ष डॉ. संदीप पाटील व दीपक नगरे यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करून आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या माध्यमातून तालुक्यातील केमिस्ट व्यावसायिकांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करून संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

