आजची मुलगी मानसिक ,शारीरिक, भावनिक दृष्ट्या सक्षम होणे काळाची गरज
श्री.आदित्य कुकरेजा
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ येथे *दिनांक 17/09/2026 गुरूवार रोजी महिला तक्रार निवारण समिती* अंतर्गत स्वसंरक्षण,जागरूकता आत्मविश्वास आणि सुरक्षा” या विषयास अनुसरून एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची माहिती देणे, संकटाच्या प्रसंगी स्वतःचे रक्षण कसे करावे, प्रसंगावधान कसे राखावे, कोणत्या प्राथमिक उपाययोजना कराव्यात आणि कशाप्रकारे आत्मविश्वासाने परिस्थितीचा सामना कसा करावा हा होता. सदर कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. बी. एच.बऱ्हाटे सर कार्यक्रमाचे प्रमुख होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य – आदरणीय श्री वाय. एम. पाटील .सर यांनी स्वीकारले.
सदर कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका व महिला तक्रार निवारण समितीचे अध्यक्षा श्रीमाती- स्वाती पाटील मॅडम ,ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्य सौ .नीना कटलर मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी जे.के. ए .इंडिया जळगाव जिल्हा शाखेचे मुख्य प्रशिक्षक श्री .आदित्य कुकरेजा हे होते. या कार्यशाळेच्या माध्यमातून श्री आदित्य कुकरेजा
यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले.संकटसमयी स्वतःचा बचाव कशा पद्धतीने करावा यासाठी मार्गदर्शन केले. सर्वात आधी शारीरिक व भावनिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे आहे असा मोलाचा सल्ला विद्यार्थिनींना दिला.
कार्यक्रमाची प्रस्तावना महिला तक्रार निवारण समितीच्या प्रमुख सौ. माधुरी चौधरी मॅडम यांनी केले, सूत्रसंचालन सौ. सुरेखा भोळे मॅडम यांनी केले .आभार प्रदर्शन सौ. जयश्री येवले मॅडम यांनी केले. . कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता समिती सदस्य सौ. कांचन राणे,सौ.जयश्री येवले आणि सर्व शिक्षिकावृंद व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.



