Friday, September 18, 2026
Homeजळगावभुसावळ येथे पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना     

भुसावळ येथे पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना     

भुसावळ येथे पर्यावरण पूरक गणेशाची स्थापना                   भुसावळ     खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी               येथील संतोष भिमराव कल्याणकर हुडको कॉलनी, यांनी
गणपती चे रूप व सजावट -पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी केली आहे .
त्यांनी “पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवणारी सजावट” असून
यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त घरच्या घरी साकारण्यात आलेल्या या सजावटीत महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा आणि पारंपरिक कलांचा सुंदर संगम करण्यात आला आहे. सजावटीसाठी शक्य तितक्या नैसर्गिक व साध्या साहित्याचा वापर करण्यात आला असून, गवताचे पारंपरिक छप्पर, बांबू/लाकडी चौकट, गोणपाट व मातीच्या रंगाचा कापड यामुळे जुन्या काळातील ग्रामीण घराचा अनुभव निर्माण केला आहे.
सजावटीच्या भिंतींवर वारली चित्रकलेच्या माध्यमातून ग्रामीण जीवन, शेती, निसर्ग आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले आहे. ॐ, पारंपरिक आकृत्या आणि हाताने केलेली सजावट यामुळे संपूर्ण देखावा अधिक आकर्षक झाला आहे.

 

या सजावटीचे वैशिष्ट्य म्हणजे बाजारातील महागडे सजावटीचे साहित्य न वापरता उपलब्ध व नैसर्गिक वस्तूंचा कल्पक वापर करून घरच्या घरी संपूर्ण देखावा तयार करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक आणि पारंपरिक संस्कृती जपणारी ही सजावट गणेशोत्सवाच्या माध्यमातून आपल्या जुन्या ग्रामीण जीवनशैलीची आठवण करून देते. नागरीकांनी अश्या पद्धतीने स्थापना केल्यास अध्यात्म पर्यावरण दोन्ही उद्दीष्टे साध्य होतात असे त्यांचे मत आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या