Wednesday, April 29, 2026
Homeआरोग्यआरोग्यम धनसंपदा : ताण-तणावमुक्त जीवनशैली आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनमोल धडे

आरोग्यम धनसंपदा : ताण-तणावमुक्त जीवनशैली आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनमोल धडे

आरोग्यम धनसंपदा : ताण-तणावमुक्त जीवनशैली आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अनमोल धडे

मुक्ताईनगर  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आजच्या धकाधकीच्या युगात माणूस शारीरिक आणि मानसिक ताणाखाली दबून जात आहे. अशा परिस्थितीत ताण-तणावावर मात करून आरोग्यमय जीवनशैली स्वीकारणे आणि आपत्ती काळात तातडीने व योग्य उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर  श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय, मुक्ताईनगर* येथे दिनांक  23 ऑगस्ट  रोजी  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) व डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज  यांच्या संयुक्त विद्यमाने  “ताण व्यवस्थापन व आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न झाली .
या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हेमंत महाजन होते.मुख्य मार्गदर्शक म्हणून *पाचपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे* सुप्रसिद्ध तज्ज्ञ डॉ. प्रवीण पाचपांडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्माईलिंग स्टोन फॉउंडेशन, मुक्ताईनगरच्या  अध्यक्षा   सौं. निताताई प्रविण पाचपांडे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते .
> कार्यशाळेच्या प्रारंभी  श्री. देवेंद्र ठोसर  यांनी बेसिक लाईफ सपोर्ट *(CPR – Cardiopulmonary Resuscitation)  चे सविस्तर मार्गदर्शन करत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवले. आपत्कालीन परिस्थितीत योग्य तंत्राने सीपीआर दिल्यास रुग्णाचे प्राण कसे वाचू शकतात याचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आले.
> यानंतर डॉ. सह्याद्री किनगे  यांनी सर्पदंशावरील प्राथमिक उपचार यावर सविस्तर माहिती दिली. चुकीच्या उपचारांमुळे होणारे धोके आणि योग्य प्राथमिक उपचारांचे महत्त्व याचे मार्गदर्शन त्यांनी केले.
डॉ. देवयानी पाटील यांनी  Throat Choking  म्हणजेच घशात अन्नपदार्थ किंवा वस्तू अडकल्यास तातडीने कोणते उपाय करावेत याचे सविस्तर विवेचन करून प्रात्यक्षिक सुद्धा दाखवले.
ताण व्यवस्थापन व आरोग्यदायी जीवनशैलीचे मार्गदर्शन
प्रमुख व्याख्याते  डॉ. प्रवीण पाचपांडे  यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात ताण-तणावाचे दुष्परिणाम, हायपरटेन्शन, हेल्दी लाइफस्टाइल, स्ट्रेस मॅनेजमेंट व न्यूट्रिशन डाएट यावर सखोल मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की आज प्रत्येकजण तणावाखाली जगतो आहे. पण योग्य आहार, सकारात्मक दृष्टीकोन, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत बदल केल्यास आपण तणावावर सहज मात करू शकतो. स्वतःला ‘मसल पॉवर’ बनवा आणि तणावमुक्त राहून आरोग्यम धनसंपदा व्हा.
डॉ. पाचपांडे यांनी आपल्या अनुभवातून अनेक उदाहरणे देत उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी वर्गाला मानसिक स्वास्थ्य आणि आत्मविश्वास वाढविणारे सल्ले दिले.
या निमित्ताने  डॉ. पाचपांडे* यांनी मुक्ताईनगरमध्ये  पाचपांडे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल  सुरू झाल्याचे फायदेही अधोरेखित केले.
गावामध्येच एक अत्याधुनिक  मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल* उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज राहत नाही.
हॉस्पिटलमध्ये *सिटीस्कॅन सेंटर, ब्लड स्टोरेज सेंटर, पूर्ण सुसज्ज ICU, आधुनिक ऑपरेशन थिएटर* यांसारख्या सुविधा सुरू केल्या आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने मदत मिळणे शक्य झाले असून परिसरातील जनतेसाठी ही मोठी दिलासा देणारी बाब ठरली आहे.
कार्यशाळेदरम्यान  डॉ. पाचपांडे व डॉ. रेड्डी लॅबोरेटरीज* यांनी एक महत्त्वाचा  उपक्रम जाहीर  केला.
महाविद्यालयातील सर्व शिक्षकांसाठी मोफत लिपीड प्रोफाइल तपासणी  (Lipids Profile Test)  करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. यामुळे शिक्षकांना आपल्या आरोग्याबाबत वेळेवर माहिती मिळेल आणि आवश्यक त्या काळजीसाठी तातडीने उपाय करता येतील.

कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य *डॉ. हेमंत महाजन* यांनी केले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात “ताण-तणावातून मुक्त होऊन… जीवनात आनंदाची उधळण करा” असा प्रेरणादायी संदेश दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य व आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा.  डॉ. वंदना चौधरी  यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.  डॉ. संजीव साळवे  यांनी केले.

या कार्यशाळेमुळे उपस्थित प्राध्यापक व कर्मचारी वर्गाला
– आपत्ती व्यवस्थापनाचे तंत्र
– प्राथमिक उपचारांचे महत्त्व
– ताण-तणावमुक्त जीवनशैलीचे रहस्य
– गावातच उपलब्ध झालेल्या आधुनिक आरोग्य सुविधांची जाणीव आणि शिक्षकांसाठी आरोग्य तपासणीची सुवर्णसंधी या सर्व विषयांवर उपयुक्त, व्यवहार्य आणि जीवनोपयोगी ज्ञान मिळाले ही कार्यशाळा खरंच प्रत्येकासाठी जीवनोपयोगी ठरली असून, मुक्ताईनगर गावासाठी आरोग्याच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरली असे उपस्थित सर्वांनी मत व्यक्त केले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या