Tuesday, February 17, 2026
Homeगुन्हाखुनाचे सत्र सुरूच : २१ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी पोलीस...

खुनाचे सत्र सुरूच : २१ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी पोलीस ठाण्यात हजर !

खुनाचे सत्र सुरूच : २१ वर्षीय युवकाची निर्घृण हत्या; संशयित आरोपी पोलीस ठाण्यात हजर !

यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील विरावली-दहिगाव रस्त्यावर एका २१ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणी दोन संशयित आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडा येथील रहिवासी मयत तरुण इम्रान युनूस पटेल (वय २१) हा असून तो सध्या यावल तालुक्यातील दहिगाव येथे आपल्या मामाकडे राहत होता. विरावली-दहिगाव रस्त्यावर असलेल्या खिरवा गावाजवळ त्याची हत्या करण्यात आली. घटनेनंतर, दोन संशयित आरोपी, ज्ञानेश्वर पाटील (वय १९) आणि गजानन कोळी (वय १९), यांनी स्वतः मोटारसायकलवरून यावल पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांसमोर हजर झाले आणि गुन्ह्याची कबुली दिली.
गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरू असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २० दिवसांपूर्वीच जामनेर तालुक्यात एकाची हत्या झाली होती. अशा घटनांमुळे, गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही असा आरोप जनतेकडून केला जात आहे. सध्या यावल पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या खुनाचे नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या