संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन संपन्न.
मुक्ताईनगर खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय व संत मुक्ताबाई माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय
आमदार श्री चंद्रकांत पाटील(तालुका क्रीडा विकास समिती अध्यक्ष), प्रमुख पाहुणे मा. श्री गिरीश वखारे साहेब तहसीलदार मुक्ताईनगर, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. श्री नितीन जंगम, तालुका क्रीडा अधिकारी मुक्ताईनगर , व मा. श्री एन.डी.काटे सर मुख्याध्यापक, प्रमुख उपस्थिती मा. श्री.जे. बी. सिसोदिया सर, श्री. व्ही. एस. जाधव सर उपस्थित होते. माननीय आमदार यांनी दीप प्रज्वलन करून मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन केले व स्पर्धेतील सहभागी खेळाडूंना राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. श्री नितीन जंगम साहेब यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस एस गायकवाड (क्रीडा शिक्षक) यांनी केले व सौ.व्ही. जे.सिसोदिया मॅडम यांनी सर्वांना शपथ दिली श्री. एस. एस. ठाकूर यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचेआभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता श्री आय. जी. पाटील सर , श्री जे.ए. पाटील सर, श्री एन आर पठाण सर श्री पी .एच खडसे, श्री एस एन पाटील, श्री एन .जी.चव्हाण , श्री सरदार भाऊसाहेब , श्री प्रदीप राजपूत श्री रवींद्र पाटील, यांनी परिश्रम घेतले.


