Sunday, November 22, 2026
Homeआरोग्यकुऱ्हा पानाचे येथे मोतीबिंदू शिबिर संपन्न

कुऱ्हा पानाचे येथे मोतीबिंदू शिबिर संपन्न

कुऱ्हा पानाचे येथे मोतीबिंदू शिबिर संपन्न
भुसावळ   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथे रोटरी क्लब भुसावळ व आयुष्मान आरोग्य मंदिर कुऱ्हा पानाचे यांच्या संयुक्त विद्यमाने उपकेंद्र येथे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले.
प्रसंगी प्रतिष्ठा महिला मंडळाचे अध्यक्ष रजनी सावकारे उपस्थित होत्या
सदर कॅम्प मध्ये 320 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. पैकी 44 रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठवण्यात आले तसेच आठ रुग्णांना किरकोळ नेत्र शस्त्रक्रिया साठी कांताई नेत्र रुग्णालय जळगाव येथे पाठवण्यात आले.
कॅम्प यशस्वी होण्यासाठी आयुष्मान आरोग्य मंदिर कुऱ्हा पानाचे येथील पूर्ण टीमने मेहनत घेतली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या