उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांची दिवाळी गोड. शिवसेनेच्या वतीने खाद्यपदार्थ किटचे वाटप.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी दि.२२
राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशान्वये यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यांवर शिधा व खाद्यपदार्थ किट वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
संपूर्ण महाराष्ट्रभरातील आदिवासी बांधवांमध्ये जाऊन त्यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प नामदार शिंदे साहेबांनी केला होता.त्याच अनुषंगाने यावल येथील बोरावल रस्त्यावरील आदिवासी वाड्यावर जाऊन स्थानिक शिवसेनेच्या वतीने १०० ते ११० आदिवासी महिलांना दिवाळीच्या फराळाचे व खाद्यपदार्थांचे किट वाटप करण्यात आले.
आदिवासी समाजातील गोरगरीब कुटुंबांचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा व्हावा, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.अचानक मिळालेल्या या दिवाळीच्या भेटीमुळे वाड्यावरील महिला व नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. उपस्थितांनी नामदार एकनाथजी शिंदे व शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
याप्रसंगी शिवसेनेचे यावल तालुकाप्रमुख राजू काठोके, जिल्हा संघटक नितीन सोनार,
महिला तालुकाप्रमुख लक्ष्मीताई मेढे,कैलास भोई, राहुल बारी यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजितदादा गट) अल्पसंख्याक शहराध्यक्ष आरिफ खान व इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

