Sunday, November 22, 2026
Homeजळगाववरणगावच्या जुन्या महामार्गावरील विकासकामांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने झटकली !

वरणगावच्या जुन्या महामार्गावरील विकासकामांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने झटकली !

वरणगावच्या जुन्या महामार्गावरील विकासकामांची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने झटकली !

दुभाजक, पथदिवे अन् सुशोभीकरणासाठी आता पीडब्ल्युडीकडे पाठपुरावा करावा लागणार                भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी      वरणगाव ता भुसावळ वार्ताहर

शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक (डिव्हायडर), पथदिवे आणि सुशोभीकरण करण्याच्या मागणीवर भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (न्हाई) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या रस्त्याचा ताबा २ जून २०२३ रोजीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (पीडब्ल्यूडी) हस्तांतरित करण्यात आल्याने या रस्त्यावरील विकासकामे आणि देखभालीची जबाबदारी आता नेही ची नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या मागणीला नॅशनल हायवे कडून थेट नकार मिळाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे .

वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील रमेश काळे यांनी २६ जुलै २०२६ रोजी न्हाईकडे निवेदन देऊन फुलगाव फाटा ते साई मंदिर तसेच तिरंगा सर्कल ते रावजी बुवा, अक्सा नगर ते शिवतीर्थ या जुन्या महामार्गाच्या मार्गावर दुभाजक उभारणे, पथदिवे बसविणे आणि सुशोभीकरण करण्याची मागणी केली होती. या मागणीला उत्तर देताना नही च्या जळगाव प्रकल्प अंमलबजावणी विभागाने ७ नोव्हेंबर २०२६ रोजी पत्र पाठवून वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. चिखली तरसोद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील वरणगाव बायपासचे काम पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावर एकवेळ सुधारणा अंतर्गत आवश्यक कामे करण्यात आली होती. त्यानंतर २ जून २०२३ रोजी हा जुना महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव यांच्याकडे अधिकृतरीत्या हस्तांतरित करण्यात आला. त्यामुळे सदर रस्ता सध्या नही च्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. परिणामी, दुभाजक उभारणे, पथदिवे बसविणे, सुशोभीकरण, देखभाल आणि रस्त्याची सुधारणा

करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विकासकामांचा चेंडू आता पीडब्ल्युडीच्या कोर्टात !

वरणगाव शहरातील जुन्या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेक ठिकाणी पथदिव्यांचा अभाव, रस्त्यावरील वाहतुकीची समस्या आणि अपघातांचा धोका लक्षात घेता या मार्गावर दुभाजक व पथदिवे बसविणे अत्यावश्यक बनले आहे. मात्र, नही ने रस्त्याच्या हस्तांतरणाचा मुद्दा पुढे केल्याने आता या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे. नही च्या पत्रानंतर नगराध्यक्ष सुनील काळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामांना मंजुरी आणि निधी मिळविण्यासाठी काय भूमिका घेतात, तसेच वरणगावच्या जुन्या महामार्गाचा विकास प्रत्यक्षात कधी होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या