Friday, September 18, 2026
Homeआरोग्यके. नारखेडे विद्यालयात डॉ. गौरी खानापूरकर मॅडम यांचे मार्गदर्शन. 

के. नारखेडे विद्यालयात डॉ. गौरी खानापूरकर मॅडम यांचे मार्गदर्शन. 

के. नारखेडे विद्यालयात डॉ. गौरी खानापूरकर मॅडम यांचे मार्गदर्शन.                                                    भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी            दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी के . नारखेडे विद्यालयात ,”सखी सावित्री “या समिती अंतर्गत विद्यार्थिनींना ” आरोग्य कसे असावे “या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विद्यार्थिनींशी संवाद साधण्यासाठी भुसावळ शहरातील सुप्रसिद्ध, नामांकित डॉ. गौरी समीर खानापूरकर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थीनींना शरीरात होणारे बदल हे कशा प्रकारे स्वीकारावे हे खूप उत्तम प्रकारे समजावून सांगितले. आपण आपल्या तब्येतीची नीट काळजी घ्यावी यासाठी आपला आहार व आपला व्यायाम हा आपल्या शरीरावर कसा परिणाम करतो, हे त्यांनी विविध उदाहरणाच्या माध्यमातून समजून सांगितले. आपल्या शरीरावर सोशल मीडियाचा कसा वाईट परिणाम होत आहे, आपला मेंदू कशाप्रकारे गोंधळून जातो हे त्यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरण देऊन समजून सांगितले.शेवटी विद्यार्थिनींच्या प्रश्नांची उत्तरे देखील डॉक्टर गौरी यांनी अतिशय समाधानकारकपणे दिली.या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाय. एन. झोपे सर , पर्यवेक्षक श्री. सुनील पाठक सर , तसेच संगणक विभाग प्रतिनिधी सौ. सारिका भारंबे मॅडम उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती हेमलता जंगले मॅडम यांनी केले, तसेच प्रमुख अतिथी यांचा परिचय व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कांचन राणे मॅडम यांनी केले तसेच कार्यक्रमासाठी शाळेतील महिला शिक्षिका सौ. स्वाती इखे , जे. डी. ठोसरे , अर्चना कोल्हे , वर्षा कुरकुरे ,उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या