Wednesday, April 29, 2026
Homeआरोग्यबामणोद येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या...

बामणोद येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न

बामणोद येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांचे आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न

बामणोद   खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी आर के इंगळे    ता. यावल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येणाऱ्या ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत बामणोद (ता. यावल) येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात दिनांक 20 रोजी महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या अभियानाचे उद्दिष्ट महिलांचे आरोग्य सशक्त करणे असून, महिला ही कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाची आधारशिला आहे, हे अधोरेखित करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन डॉ. मुशिब्बीर सैय्यद व डॉ. प्राजक्ता चव्हाण (वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र पाडळसा) यांच्या अध्यक्षतेखाली झाले.
या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर (जि.प. जळगाव) व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी (ता. यावल) यांचे मार्गदर्शन लाभले.

 

Oplus_131072

शिबिरात एकूण 64 महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सामान्य आरोग्य, रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह तपासण्या व आवश्यक वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. अशफाक शेख (समुदाय आरोग्य अधिकारी), तसेच आरोग्य सेविका पूजा नेवे, जयश्री सोनवणे, रंजना वारके, सुनीता इंगळे, रेखा झांबरे, प्रतिभा बोंडे, निर्मला भंगाळे (आशा सेविका) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या