Friday, May 1, 2026
Homeआंदोलनमुख्य अभियंता दिपनगर यांच्या विरोधात विल्हाळा ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; लोक संघर्ष मोर्चाच्या...

मुख्य अभियंता दिपनगर यांच्या विरोधात विल्हाळा ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा; लोक संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरु

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील विल्हाळा येथील प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी मुख्य अभियंता दिपनगर (राजेश मोराळे) यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांच्या मनमानी कारभाराला विरोध करण्यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

दि 19 सोमवार रोजी औरंगाबाद खंडपीठात विल्हाळा येथील राखाड कामगारांच्या बाजूने अंतिम निर्णय झाला असून,न्यायालयाने स्पष्टपणे स्थानिक प्रकल्पग्रस्तांना पुढील वीस वर्षांपर्यंत राखी वितरणाची जबाबदारी देण्याचे आदेश दिले आहेत.तसेच, दि 1ऑक्टोबर 2025 पर्यंत नियोजन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

परंतु,न्यायालयाचा स्पष्ट आदेश असतानाही मुख्य अभियंता राजेश मोराळे यांनी कोणतीही ठोस कारवाई न करता केवळ आश्वासनांची साखळी उभी केली,असा ग्रामस्थांचा आरोप आहे.यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून,स्थानिकांच्या संयमाचा अंत झाल्याचे चित्र आहे.गेल्या चार महिन्यांपासून उपासमारीच्या स्थितीत असलेल्या प्रकल्पग्रस्त मजुरांना न्याय मिळवून देण्यासाठी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय प्रतिभाताई शिंदे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलनास सुरुवात झाली आहे.

या आंदोलनात विल्हाळा ग्रामपंचायतीच्या सरपंच शारदाबाई हेमंत पाटील,नीलिमा निलेश महाजन,जयश्री राजेंद्र महाजन,इंदुबाई कुरकुरे, सुनिता ठाकरे,सिंधुबाई पवार,सागर शिंदे,हेमत पाटील,नितीन शिरवाडे,विजय पाटील,जितेंद्र सोनवणे,हर्षल सुरवाडे,प्रकाश कोळी,मधुकर ठोके,सागर बोदडे,प्रशांत राणे,गणेश चौधरी,अतुल चौधरी,राजीव धांडे,राहुल पाटील,समाधान वाघ आदींसह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

सरकारने व न्यायालयाच्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करून स्थानिकांना रोजगाराची हमी द्यावी,अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल,असा इशारा लोक संघर्ष मोर्चाने दिला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या