Thursday, August 13, 2026
HomeजळगावQR Code नसलेल्या QR Code सह नवीन दाखले मिळावेत : राकेश भामरे...

QR Code नसलेल्या QR Code सह नवीन दाखले मिळावेत : राकेश भामरे उर्फ सोनार.

QR Code नसलेल्या QR Code सह नवीन दाखले मिळावेत : राकेश भामरे उर्फ सोनार.

यावल. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी     दि.१३
जन्म-मृत्यू दाखल्यांना वैध मान्यता देणे व जीर्ण नोंदवहीतील नोंदींच्या आधारे QR Code सह नवीन दाखले मिळणे संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष राकेश भामरे उर्फ सोनार यांनी केली.

दि.१२ ऑगस्ट २०२६ रोजी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आले आहे की संपूर्ण राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी पूर्वी दिलेल्या जुन्या जन्म-मृत्यू दाखल्यांवर QR Code नसल्यामुळे सध्या विविध शासकीय,शैक्षणिक,बँकिंग व पासपोर्ट कामांसाठी हे दाखले अमान्य केले जात आहेत.यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अनेक संस्थांमधील जुन्या व जीर्ण नोंदवह्यांमध्ये अधिकृत नोंदी असूनही QR Code सह
संगणकीकृत दाखले मिळण्यात अडचणी येत आहेत.म्हणून यासाठी केवळ QR Code नाही म्हणून जुने अधिकृत दाखले नाकारू नयेत असे स्पष्ट निर्देश सर्व विभागांना देण्यात यावेत. जुन्या नोंदवहीतील नोंदीची पडताळणी करून नागरिकांना QR Code सह नवीन दाखले देण्यासाठी संपूर्ण राज्यात एकसमान मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात.आणि जुन्या व जीर्ण नोंदवह्यांचे तातडीने डिजिटायझेशन करून त्या राज्य
नोंदणी प्रणालीवर उपलब्ध कराव्यात.नागरिकांची होणारी अडवणूक थांबवण्यासाठी या
विषयावर स्वतंत्र शासन निर्णय काढून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अंमलबजावणीचे आदेश दयावेत अशी सार्वजनिक हिताची मागणी जिल्हाध्यक्ष राकेश भामरे उर्फ सोनार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या